News Flash

‘पांड्या आज करके आया क्या?’ , मैदानात मुलीनं केलं हार्दिकला ट्रोल

हार्दिकला पुन्हा एकदा ट्रोल करण्याची आयती संधी नेटकऱ्यांना मिळाली.

‘कॉफी विथ करण’ या चॅटशोदरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून हार्दिक पांड्या वादात सापडला होता. त्या व्यक्तव्यामुळे त्यानं कमावलेली प्रतिष्ठा एका क्षणात धुळीला मिळाली. त्याच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे देशभरातून त्याच्यावर मोठ्या प्रमाणत टीका झाली. इतकंच नाही तर निलंबनाची कारवाईही त्याच्यावर करण्यात आली. या गोष्टीला महिनाभराचा अवधी उलटला असला तरी चाहते त्याचं आक्षेपार्ह वक्तव्य अजूनही विसरले नाही असंच दिसतं आहे.

याची प्रचिती ऑकलंडमध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान आली. ऑकलंड येथे पार पडलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात एका तरुणीनं हार्दिकला या मुद्दावरून ट्रोल केलं. या तरुणीच्या हातात असलेल्या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. भर मैदनात ‘पांड्या आज करके आया क्या?’ असं ठळक अक्षरांमध्ये लिहिलेला बॅनर घेऊन तरुणी उभी होती. त्याचवेळी कॅमेरात हा सर्व प्रकार कैद झाला आणि मग काय अल्पावधीतच ही तरुणी आणि तिच्या हातातलं बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालं.

या तरुणीमुळे महिलांप्रती असभ्य वक्तव्य करणाऱ्या हार्दिकला पुन्हा एकदा ट्रोल करण्याची आयती संधी नेटकऱ्यांना मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 4:16 pm

Web Title: female fan trolls hardik in new zealand pandya aaj karke aaya kya
Next Stories
1 वाचा भूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’बद्दल रंजक गोष्टी
2 ठरलं ! आकाश अंबानी आणि श्लोका मेहता ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
3 Video : प्रिया प्रकाश वारियरचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल…
Just Now!
X