20 February 2019

News Flash

FIFA World Cup 2018 CRO vs ENG : जिंकली क्रोएशिया चर्चा मात्र राष्ट्राध्यक्षांची

एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना खेळांडूसोबत अशा पद्धतीनं विजयाचा आनंद लुटताना क्वचितच कोणी पाहिलं असेल. त्यामुळे ५० वर्षीय कोलिंडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

कोलिंडा या ५० वर्षांच्या आहेत.२०१५ मध्ये त्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आल्या.

FIFA World Cup 2018 CRO vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या उपांत्य फेरीत क्रोएशियानं इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. पहिल्यांदाच क्रोएशियानं फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. खरं तर कोणाच्याही ध्यानी मनी नसताना या संघानं अनेक बलाढ्य संघाला नमवत इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. इंग्लंडला नमवून हा संघ विजयी झाला त्यामुळे या देशातील फुटबॉल चाहत्यांनी जंगी सेलिब्रेशन केलं. मात्र या संघाबरोबरच या देशाच्या राष्ट्राध्यक्ष कोलिंडा ग्रॅबर कितारोव्हिच या देखील तितक्याच चर्चेत आहे.

इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया असा रंगलेला महत्त्वपूर्ण सामना पाहण्यासाठी कोलिंडा स्वत: स्टेडिअममध्ये उपस्थित होत्या. आपल्या टीमला त्या प्रोत्साहन देत होत्या. सामना जिंकल्यानंतर व्हिआयपी भागात बसलेल्या कोलिंडा यांनी रशियन पंतप्रधानांच्या समोर जल्लोष केला. इतकंच नाही तर संघाच्या ड्रेसिंग रुमध्ये जाऊन त्या स्वत: जल्लोषात सहभागी झाल्या. संघांतील खेळांडूंसोबत त्यांनी नाचही केला. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला खेळांडूसोबत अशा पद्धतीनं विजयाचा आनंद लुटताना क्वचितच कोणी पाहिलं असेल. त्यामुळे कोलिंडा याचं जंगी सेलिब्रेशन सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. त्याचा तो दिलखुलासपणा सगळ्यांनाचा भावला म्हणूनच सोशल मीडियावर क्रोएशियन संघाबरोबरच त्यांच्यादेखील चर्चा होत आहेत. मात्र सामन्यादरम्यान त्यांना काही समस्येचाही सामना करावा लागला. एका अमेरिकन पॉर्न स्टारशी त्यांच्या चेहरा मिळता जुळता असल्यानं अनेक चाहत्यांनी  त्यांची खिल्ली उडवली.  काहींनी बिकीनीमधले फोटोही सोशल मीडियावर शेअर केले. मात्र हे फोटो कोलिंडा यांचे नसून ते पॉर्न स्टारचे असल्याचं अनेकांनी दाखवून दिलं तेव्हा कुठे हे प्रकरण शांत झालं.

कोलिंडा या ५० वर्षांच्या आहेत. २०१५ मध्ये त्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आल्या. राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून येण्यापूर्वी त्या क्रोएशियाच्या अमेरिकेतील दूतावासात काम करत होत्या. क्रोएशिअन भाषेव्यतिरिक्त इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज भाषेवर त्यांचं प्रभुत्त्व आहे तसेच जर्मन फ्रेंच, इटालीयन या भाषांही त्यांना अवगत आहेत. आता क्रोएशियाचा अंतिम सामना फ्रान्ससोबत असणार आहे. १५ जुलै हा सामना होणार आहे.

First Published on July 12, 2018 11:26 am

Web Title: fifa world cup 2018 cro vs eng croatia president kolinda grabar kitarovic has been praised by fans