अफगाणिस्तान वायुदलातील पहिली महिला वैमानिक होण्याचा मान ज्या महिलेला मिळाला त्या नीलोफर रहमानीवर आता अमेरिकेकडे आश्रय मागण्याची वेळ आली आहे. २०१५ मध्ये नीलोफरला आंतरराष्ट्रीय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पण आता तिला मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याचबरोबर अफगाणिस्तामधल्या पुरुष वैमानिकांकडून तिला अपमान सहन करावा लागत आहे त्यामुळे अमेरिकेकडे तिने आश्रय मागितला आहे.

वाचा : दानशूर भिकारी; देवाच्या चरणी अर्पण केला चांदीचा मुकुट

नीलोफर रहमानी ही अफगाणिस्तानमधील पहिली महिला वैमानिक आहे. २०१५ मध्ये ती प्रशिक्षणासाठी अमेरिकेत गेली. याआठवड्यात ती करारानुसार अफगाणिस्तानमध्ये परतणार होती. मात्र तिने मायदेशी परतायला ठाम नकार दिला आहे. इतकेच नाही तर तिने अमेरिकेकडे राजाश्रय देखील मागितला आहे. अफगाणिस्तानमधील पुरुष वैमानिकांकडून आपल्याला वारंवार अपमानित केले जाते. तसेच इतर धार्मिक अतेरिकी संघटनांकडून आपल्याला जिवे मारण्याच्या धमक्या येतात तेव्हा अमेरिकेकडे तिने राजाश्रय मागितला आहे. अफगाण वायुदलाकडून आपल्याला मिळणारा पगारही कमी असल्याचे तिने सांगितले त्यामुळे अमेरिकन वायुदलात रुजू होण्याची इच्छा तिने बोलून दाखवली.

वाचा : ‘ती’ने दाखवून दिला नवा रस्ता, वाचून बदलेल ‘अरेंज्ड मॅरेज’कडे पाहण्याचा दृष्टीकोन

जर आपण अफगाणिस्तानमध्ये परतलो तर माझी हत्या करण्यात येईल अशी भीती तिने ‘सीएनएन’ला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखवली. अफगाणिस्तानमधील परिस्थिती सुधारत नाही तर दिवसेंदिवस ती अत्यंत वाईट होत चालली आहे असेही तिने सांगितले तेव्हा जर त्या देशात परतलो तर आपल्याला सतत सुरक्षा रक्षक सोबत घेऊन फिरावे लागले अशीही भिती तिने बोलून दाखवली.