11 December 2018

News Flash

तृतीयपंथीयाला मिळाली शासकीय नोकरी

एक उत्तम आदर्श

तृतीयपंथीयांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी अजूनही बदललेली नाही. त्यामुळे त्यांना नोकरी मिळणे दुरापास्तच. परंतु संघर्ष करत पुढे निघालेल्या एका तृतीयपंथीयाला नुकतीच नोकरी मिळाली आहे. तीही सरकारी. तिरुचिरापल्ली येथील ३७ वर्षीय तृतीयपंथीयाला राज्य शासनाच्या विभागात वाहनचालक म्हणून नोकरी मिळाली.  एम. स्नेहाला वाहनचालक म्हणून १० वर्षांचा खासगी क्षेत्रातील अनुभव आहे. के. राजमणी यांनी त्यांना नोकरीचे नियुक्ती पत्र दिले.

यशस्वी होण्यासाठी ‘हे’ पाच फंडे नक्कीच उपयोगी ठरतील

सरकारी नोकरी मिळाल्याचा आपल्याला आनंद झाला असून, तृतीयपंथीयांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. यामुळे आमच्या समाजात अतिशय चांगला मेसेज जाईल. भीक मागण्यापासून तृतीयपंथी समाजाला परावृत्त करण्यासाठी आपण यापुढेही त्यांच्यासाठी काम करतच राहू, असंही स्नेहा म्हणाली.

First Published on November 14, 2017 12:30 pm

Web Title: first transgender gets government driver job