टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अँकर संजना गणेशन हिच्यासोबत सोमवारी विवाहबंधनात अडकला. गोव्यात जवळच्या नातेवाइक आणि खास मित्रांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचे विधी रविवारपासून सुरू झाले होते.

जसप्रीत बुमराहच्या लग्नाची चर्चा गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु होती. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यासाठी सुट्टी घेतल्यामुळे बुमराह कोणाशी लग्न करणार याची याची चर्चा सुरु होती. प्रथम एका दक्षिणेतील अभिनेत्रीचे नाव समोर आले होते. पण नंतर पुण्यात जन्मलेल्या संजना गणेशन सोबत तो विवाह करणार असल्याचे समोर आले. बुमराह आणि संजना या दोघांनीही आपल्या नात्याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. अखेर सोमवारी बुमराहने ट्विटरवरुन लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर संजनासोबतच त्याचा विवाह झाल्याचं स्पष्ट झालं.

आणखी वाचा- Miss India ते Mrs Bumrah… जाणून घ्या जसप्रीत बुमराहच्या होणाऱ्या पत्नीबद्दलच्या खास गोष्ट

लग्नाचे फोटो पोस्ट करताना बुमराहने, ” प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे… आणि या नव्या प्रवासाची बातमी तुमच्यासोबत शेअर करतोय यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे, अशा आशयाचं कॅप्शन दिलं होतं. त्यानंतर आता बुमराह आणि संजनाच्या लग्नाचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोघं एकमेकांच्या गळ्यात फुलांचा हार घालताना दिसतायेत. ४३ सेकंदाचा हा व्हिडिओ सध्या नेटकऱ्यांमध्ये वेगाने व्हायरल होतोय.
बघा व्हिडिओ :-

आणखी वाचा- अरररर! बुमराहची पत्नी संजनाऐवजी संजय बांगरला दिल्या शुभेच्छा, मयंक अग्रवालकडून झाला घोळ

दरम्यान, संजनाचा जन्म ६ मे १९९१ रोजी महाराष्ट्रातील पुणे शहरात झाला. ती आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्सचा शो नाइट क्लबची देखील होस्ट होती. २०१२ मध्ये संजना पहिल्यांदा स्प्लिट्सविला ७ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तेव्हा दुखापत झाल्याने संजनाला कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला होता. संजना टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी एक मॉडेलही होती. तिने पुण्यातून इंजिनिअरिंगची डिग्री घेतली होती त्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. २०१४च्या मिस इंडियाच्या फायनलपर्यंत ती पोहोचली होती.