News Flash

स्वतंत्र भारताचा पहिला मतदार वयाच्या शंभरीत पुन्हा बजावणार मतदानाचा हक्क

हिमाचल प्रदेशमध्ये करणार मतदान

हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एक अनोखा योग जुळून येणार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मतदान केलेले श्याम शरण नेगी या निवडणुकीसाठी ९ नोव्हेंबरला मतदान करणार आहेत. वयाच्या शंभरीत पोहचलेले नेगी गेली ६६ वर्षे मतदानाचा हक्क बजावत आहेत, ही अतिशय कौतुकाची बाब आहे. किन्नोर येथे राहणारे नेगी यांच्या हालचालींवर वार्धक्य आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. हे लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी विशेष गाडीची व्यवस्था केली आहे.

विशेष म्हणजे १०० वर्षाच्या या गृहस्थाचे मतदान केंद्रवर विशेष पद्धतीने स्वागत करण्यात येईल. लाल पायघड्या घालून त्यांचे स्वागत केले जाईल. किन्नोर येथे पहिले मतदान २५ ऑक्टोबर १९५१ मध्ये झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी मंडी-महासु (मंडी) या क्षेत्रासाठी मतदान केले होते. निवडणूक आयोगाने १९५२ च्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात पहिल्या निवडणुका होतील असे जाहीर केले होते. मात्र, काही कारणांनी हिमाचल प्रदेशच्या किन्नोरमध्ये त्याआधीच निवडणूका घेण्यात आल्या. नेगी यांनी त्यावेळी किन्नोर येथील मतदान केंद्राचे अधिकारी म्हणून भूमिका बजावली होती.

किन्नोर हा अतिशय दुर्गम भाग होता. त्यातही पहिल्यांदाच मतदान असल्याने मतदानाला कोणीच उपस्थित राहिले नव्हते. त्यावेळी नेगी यांनी स्वतःच आपले मतदान केले आणि ते देशाचे पहिले मतदार ठरले. विशेष म्हणजे त्यानंतर नेगी यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. तब्बल एक महिना या परिसरात फिरून त्यांनी लोकांना मतदानाचे महत्त्व पटवून दिली. नेगी यांच्या कार्याबद्दल त्यांना अनेकदा गौरवण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 11:25 am

Web Title: first voter of india from himachal pradesh will cast vote again on 9th november sham saran negi at his age 100
Next Stories
1 Video : अन् मोबाईलनं खिशातच पेट घेतला
2 परदेशात वाढलेल्या महिलेनं ‘अशी’ जपली भारतीय संस्कृती
3 ‘प्राईम कस्टमर’साठी अॅमेझॉननं आणली नवीन सेवा
Just Now!
X