News Flash

मच्छिमाराला सापडला २० लाखांचा निळा झिंगा; म्हणाला “लाखात एक, या झिंग्याला मी….”

एका मच्छीमार समुद्रकिनारी मासेमारी करत असताना अचानक त्याच्या गळाला हा दुर्मिळ झिंगा लागला. त्यानंतर मच्छिमाराने या दुर्मिळ झिंग्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

fisherman-finds-blue-lobster
(Photo: facebook/ Ricky Greenhowe)

स्कॉटलंडमध्ये एका मच्छिमाऱ्याला मासेमारी करताना दुर्मिळ निळ्या रंगाचा झिंगा सापडला. या झिंग्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा झिंगा चक्क चमकदार निळाशार रंगाचा असून याची किंमत जवळपास २० लाखांच्या आसपास आहे. असा दुर्मिळ झिंगा सापडल्याने मच्छिमार सध्या खूपच खूश आहे. त्याने या दुर्मिळ झिंग्याचा फोटो फेसबूकवर शेअर केला. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

स्कॉटलंडमधील ४७ वर्षीय मच्छीमार रिकी ग्रीनहोवे हे मासेमारी करत असताना त्यांच्या गळाला हा दुर्मिळ झिंगा लागला. सुमारे 3lb इतक्या वजनाचा निळ्या रंगाचा हा दुर्मिळ झिंगा गळाला लागलेला पाहून रिकी आश्चर्य झाले. कारण, माशांच्या शोधात असताना त्यांनी हा एक दुर्मिळ निळा झिंगा शोधला. काही जनुकीय कारणांमुळे या दुर्मिळ झिंग्यामध्ये एक विशिष्ट प्रोटिनचा अभाव निर्माण होतो आणि त्याला असा निळा रंग मिळतो. त्यामुळे अर्थातच हा झिंगा दुर्मीळ म्हणजे लाखांमध्ये एखादाच असतो. म्हणूनच ‘लाखात एक’ अशी कॅप्शन देत मच्छिमाराने या दुर्मिळ झिंग्याचा फोटो फेसबूकवर शेअर केला.

आणखी वाचा: मुंबई पोलिसांपासून ते नेटफ्लिक्सपर्यंत…शिक्षक दिनाच्या पोस्ट पाहून वाटेल आश्चर्य

आणखी वाचा : पाण्यात उडी घेत महाकाय मगरीची कूल एन्ट्री; पहा मजेशीर व्हिडीओ

या दुर्मिळ प्राण्याला पकडल्यानंतर मच्छिमार ग्रीनहोव यांनी आपण स्वप्न तर पाहत नाहीत ना याची खात्री करण्यासाठी स्वतःला चिमटा काढला, असं बीबीसीसोबत बोलताना म्हटलंय. यापुढे बोलताना त्यांनी सांगितंल, “मी मॅकडफ अॅक्वेरियमला ​​फोन करून त्यांना ते हवंय का, असं विचारणार आहे. नाही तर मी या दुर्मिळ झिंग्याला परत समुद्रात पाठवणार आहे.” हा खूप दुर्मिळ प्राणी आहे आणि त्याला एका भांड्यात ठेवणं हे लाजिरवाणं ठरेल, असं देखील मच्छिमाराने बीबीसीसोबत बोलताना म्हटलंय.

मच्छिमार रिकी यांनी या दुर्मिळ निळ्या झिंग्याचा फोटो फेसबूकवर शेअर केल्यानंतर वाऱ्यासारखा पसरला. नेटकऱ्यांनी देखील विविध प्रकारच्या कमेंट्स देण्यात सुरूवात केली आहे. “सुपर”, “अतिशल दुर्मिळ” अशा कमेंट्स करत नेटकरी मंडळी मच्छिमार रिकी यांचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 4:42 pm

Web Title: fisherman finds blue lobster shares pics images go viral prp 93
Next Stories
1 पाण्यात उडी घेत महाकाय मगरीची कूल एन्ट्री; पहा मजेशीर व्हिडीओ
2 अफगाणिस्तान सरकारचं नेतृत्व करणारा तालिबानी नेता पाकिस्तानी?; समोर आला पासपोर्ट अन् राष्ट्रीय ओळखपत्र
3 मुंबई पोलिसांपासून ते नेटफ्लिक्सपर्यंत…शिक्षक दिनाच्या पोस्ट पाहून वाटेल आश्चर्य
Just Now!
X