परदेशात असलेली चॅलेंजची पद्धत नुकतीच भारतातही आली असून मागील वर्षभरात देशात अनेक चॅलेंज गाजली. यातील काही चॅलेंज ही मजा म्हणून करण्याची असली तरीही ती जीवघेणी होती. त्यामुळे त्यात काहींनी आपला जीवही गमावला. यातील सर्वाधिक गाजलेल्या काही चॅलेंजेसविषयी…

किकी चॅलेंज

‘किकी डु यू लव मी’ या गाण्याने तरुणाईला बेभान करून टाक ले असले तरी या गाण्याच्या माध्यमातून समाजमाध्यमावर फिरणारे ‘किकी चॅलेंज’ जोरदार गाजले. हे चॅलेंज जगभरातील पोलिसांसाठी डोकेदुखी ठरले. या चॅलेंजच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या स्टंटबाजीमुळे ठिकठिकाणी अनेक अपघात घडले होते. या चॅलेंजमध्ये चालत्या मोटारीतून बाहेर उडी मारून त्याच्या बाजूला उभे राहून इन माय फिलिंग या गाण्यावर नृत्य केले जाते. कच्या ‘स्कॉर्पियन’ अल्बममधील या गाण्यावरचा पदन्यास करताना तो चालत्या गाडीतून बाहेर येऊन करायच्या आणि नाचल्यावर पुन्हा गाडीत जाऊन बसायचं असा अत्यंत धोकादायक प्रकार ‘किकी चॅलेंज’ म्हणून समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. किकी चॅलेंजचं हे खूळ स्पेन, यूएस, मलेशिया आणि यूएईसारख्या देशांतही पसरलं आहे. विशेष म्हणजे ड्रेकच्या मूळ गाण्यात कुठेही असा स्टंट नाही. चालत्या गाडीतून बाहेर येऊन डान्स करून पुन्हा गाडीत बसेपर्यंत गाडीचा वेग १० किमी प्रति तास ठेवला जातो. गाडीत कॅमेरा ठेवून त्याचे चित्रण केले जाते.

हम फीट तो इंडिया फिट चॅलेंज

राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यायाम करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा फिटनेस मंत्र देत राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रतिक रोशनलाही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केलं होतं. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लोकांना व्यायाम करत असतानाचा आपला व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितलं आहे. यानंतर अनेक खेळाडू, राजकीय नेते, कलाकार यांनीही या चॅलेंजला प्रतिसाद दिला होता. फिटनेस विषयातील असे चॅलेंज एखाद्या नेत्याने देण्याची ही पहिलीच वेळ होती.

मोमो चॅलेंज

हा ब्ल्यू व्हेल चॅलेंजप्रमाणे एक ऑनलाईन गेम आहे. यात व्हाटसअ‍ॅप अकाऊंटच्या माध्यमातून विशिष्ट युजर्सकडून आलेले विविध चॅलेंजेस स्वीकारायचे असतात. काही ठिकाणी फेसबुक ग्रुप्समधून याचा प्रचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यातील बहुतेक चॅलेंजेस हे स्वपीडेला प्रोत्साहन देणारे असतात. यात सहभाग होणार्‍याला अतिशय भयंकर हिंसक असे व्हिडीओज, प्रतिमा अथवा अ‍ॅनिमेशन्स पाठविले जाते. यातून त्याला ब्रेनवॉश करून हिंसक कृत्यासाठी तयार केले जाते. यामुळे हा गेम खेळणारा हळूहळू आत्मनाशाच्या मार्गावर प्रचंड गतीने आगेकूच करू लागतो. यामुळे देशात अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या.

फॉलिंग स्टार्स चॅलेंज

चीनमध्ये व्हायरल होत असणाऱ्या सोशल नेटवर्किंग ट्रेण्डमध्ये अनेकजण आपली संपत्ती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. या नव्या व्हायरल चॅलेंजचे नाव आहे ‘फ्लॉण्ट यूआर वेल्थ’ म्हणजेच तुमची संपत्ती मिरवा.या फोटोमध्ये तुम्ही खूप श्रीमंत आहात असा दाखवणारा फोटो काढायचा आणि तो शेअर करायचा. मात्र हा फोटो काढताना तुम्ही एखाद्या गाडीमधून बाहेर येताना जमीनीवर पडलात असं भासवणारा हा फोटो हवा ही अट आहे.चीनमधील या चॅलेंज ट्रेंडने इन्स्टाग्रामवरुन पाश्चिमात्य देशांमधील नेटकऱ्यांना भूरळ पाडली आहे. अनेकजण इन्स्टाग्रामवर या चॅलेंजच्या माध्यमातून आपली संपत्ती मिरवाताना दिसत आहेत. मुळात अशाप्रकारचा एक ट्रेंड अमेरिकेमध्ये याआधीच येऊन गेला आहे.

लीप सिंक बॅटल चॅलेंज

एका बाळाचा आपल्या बाबांसोबत लिपसिंक करतानाचा व्हिडियो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये ही दोन वर्षांची मुलगी असून तिच्या आईने आपला नवरा आणि बाळ यांचा व्हिडियो सोशल मीडियावर अपलोड केला. यात हे बाळ आपल्या बाबांच्या कडेवर बसल्याचे दिसत आहे. हे चिमुकले बाळ आपले बाबा ज्याप्रमाणे हावभाव करतील नेमके त्याचप्रमाणे हावभाव करत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. त्यानंतर अशाप्रकारेच एकमेकांशी लीप सिंक करण्याचे चॅलेंज आले आणि ते सोशल मीडियावर व्हायरलही झाले.