X

१९७१ मधील किराणा मालाचे दर पाहिले तर तुम्हीही अवाक् व्हाल!

एक किलो बटाटे ६० पैसे

काही वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारने ‘अच्छे दिन’चं स्वप्न देशवासीयांना दाखवलं. महागाई कमी होईल, गरिबी नष्ट होईल, भ्रष्टाचाराला आळा बसेल अशी एक ना अनेक स्वप्न जनतेला दाखवली. पण सध्यातरी जनतेच्या पदरी घोर निराशाच आहे. महागाई कमी होण्याची चिन्ह नाहीत, उलट महागाईचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

Viral Video : पाहा, हॉटेलचं बिल चुकवण्यासाठी त्यानं काय केलं?

दोन दिवसांपूर्वी घरगुती वापराच्या सिलिंडर गॅसची किंमत १ रूपया ५० पैशांनी वाढली. एलपीजी गॅसवरील सबसिडी संपविण्यासाठी सिलिंडरच्या दरात दर महिन्याला वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यानुसार किंमती येणाऱ्या काळात वाढतच जाणार आहेत. गेल्या महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी सिलिंडरचे दर ७ रूपयांनी वाढवण्यात आले होते. सिलिंडरचे दर वाढत आहे, त्यातून पेट्रोल देखील महागलं आहे. भारतात ८० रुपये प्रतिलीटर दराने पेट्रोलची विक्री होते आहे. मागील महिन्यात टोमॅटोच्या किमतीनीही प्रतिकिलोमागे शंभरी पार केली. कांदा, डाळींसारख्या पदार्थांच्या किमती देखील गेल्यावर्षी गगनाला भिडल्या होत्या. देशभर महागाई विरोधात संतापाची लाट आहे.

जाणून घ्या ‘आयफोन X’ मुळे कशी होते सॅमसंगची चांदी

अशाताच सध्या सोशल मीडियावर एक व्हॉट्स अॅप मेसेज व्हायरल होत आहे. ४६ वर्षांपूर्वीच्या किराणा मालाची यादी असणारा हा फोटो आहे. १९७१ साली डाळ, तांदूळ, तेल कांदे-बटाटे अशा आवश्यक वस्तूंचे दर काय होते, यांची नोंद या यादीत पाहायला मिळते. त्याकाळी २ रुपये ७५ पैसे दराने दोन किलो तांदूळ, ६० पैसे दराने एक किलो बटाटे, १ रुपया ९५ पैसे दराने तूरडाळ बाजारात उपलब्ध होती. आता हेच दर गेल्या चाळीस वर्षांत ४० ते ६० पटींनी वाढले आहेत. या यादीवर वरपासून खालपर्यंत नजर मारली तर त्याकाळी खरे ‘अच्छे दिन’ होते असं तोंडी आल्यावाचून राहणार नाही हे नक्की!

ही यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
First Published on: October 5, 2017 11:38 am
Outbrain