28 October 2020

News Flash

VIDEO: तीन पिशव्या झाडण्यासाठी ३२ वेळा झाडू फिरवणारे मोदी झाले ट्रोल

३२ वेळा झाडू मारूनही मोदींना अखेर हातानेच त्या पिशव्या उचलव्या लागल्या

मोदी झाले ट्रोल

इंटरनेटवर कधी काय होईल सांगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील पहाडगंज येथे स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत केलेल्या साफसफाईचा व्हिडीओ सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ सध्या मोदींनी तीनच पिशव्या झाडण्यासाठी ३२ वेळा झाडू फिरवल्यामुळे चर्चात आला आहे. विशेष म्हणजे ३२ वेळा झाडू फिरवल्यानंतरही या पिशव्या मोकळ्या जागी येण्याऐवजी गवतामध्ये आणखीन अडकल्या. त्यामुळे मोदींना अखेर हातानेच त्या पिशव्या उचलव्या लागल्या.

देशभरात ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचे शनिवारी मोदींच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदींबरोबच, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह व अन्य केंद्रीय मंत्री हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरलेले दिसले. पंतप्रधान मोदींनी स्वत: दिल्लीमधील पहाडगंज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च माध्यमिक शाळेतील परिसरामध्ये झाडू हातात घेऊन साफसफाई केली. मोदींच्या या साफसाई मोहिमेचा व्हिडीओ एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केला. या व्हिडीओत मोदी झाडूच्या मदतीने गवतामध्ये आणि झाडांमध्ये अडकलेल्या पिशव्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र बऱ्याच वेळा झाडू फिरवूनही या पिशव्या बाहेर न आल्याने मोदींनी अखेर हातानेच त्या उचलल्याचेही या व्हिडीओत दिसते. अनेकांनी हा व्हिडीओ रिट्वीट करताना ‘कोट्’ करुन मोदींनी झाडूच्या मदतीने केलेल्या साफसाफाईची खिल्ली उडवली आहे.

या ट्विटचे स्क्रीनशॉर्टही फेसबुकवर व्हायरल होताना दिसत आहेत.

फेसबुकवर व्हायरल होणारी एक पोस्ट

तर एएनआयने ट्विट केलेल्या व्हिडीओवरून भाजपा समर्थक आणि भाजपा विरोधकांची चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. भाजपाच्या समर्थकांनी झाडू हाती घेणाऱ्या पंतप्रधानांची स्तृती केली तर विरोधकांनी ही अनेक फोटो आणि कमेन्ट पोस्ट करत स्वच्छ जागेवर झाडू मारून काही होणार नाही अस्वच्छ जागा स्वच्छ करा असे टोले लगावले. खाली दिलेल्या ट्विटवरील रिप्लायवर क्लिक करून तुम्ही समर्थक आणि विरोधकांमधील ही चर्चा वाचू शकता.

अभियानाला सुरुवात होताच देशाच्या विविध भागांमध्ये भाजपाचे नेते आणि सरकारी अधिकारी हातात झाडू घेऊन साफसफाईसाठी रस्त्यावर उतरलेले दिसले. यामध्ये रतन टाटा, अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच सिनेमा, उद्योग आणि राजकारणातील अनेक बड्या नावांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 3:44 pm

Web Title: for 3 plastic bags modi used the broom 32 times in swachhata hi seva got trolled on twitter
Next Stories
1 हुसेनी ब्राह्मण का पाळतात मोहरम? अभिनेता संजय दत्तपर्यंतची रंजक परंपरा
2 Asia Cup 2018 : विराट कोहलीला पळपुट्या म्हणणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरला गंभीरने सुनावले
3 एकाकी गाढवासाठी गावकऱ्यांनी शोधली ‘वधू’… अन् लावले लग्न
Just Now!
X