एकीकडे भारतामध्ये इंधनदरवाढीवरुन सरकार विरुद्ध विरोधक असं रान पेटलेलं असतानाच दुसरीकडे परदेशात मात्र इंधनाची आणि खास करुन पेट्रोलची एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चा सुरुय. ही चर्चा आहे पेट्रोलचा सुगंध असणाऱ्या सेंटची. आता तुम्हाला प्रश्न पडेल की पेट्रोलचा सुगंध असणाऱ्या सेंटची काय गरज. थेट जावं पेट्रोल पंपवर आणि घ्यावा पेट्रोलचा सुगंध. मात्र हा सेंट खास इलेक्ट्रीक व्हेइकल चालवणाऱ्यांसाठी तयार करण्यात आलाय. म्हणजेच तंत्रज्ञानामुळे जे पेट्रोलच्या या सुगंधापासून दुरावलेत त्यांच्यासाठी जगप्रसिद्ध फोर्ड कंपनीने हा जुगाड शोधून काढलाय. विशेष म्हणजे या सेंटला प्रचंड मागणी आहे.

कसा आहे हा सेंट?

ई.व्ही. एस. मध्ये संक्रमण सुलभ व्हावे या उद्देशाने फोर्डने ‘मॅच-एऊ’ (Mach-Eau) नावाने नवीन प्रीमियम सेंट तयार केला आहे. नवीन सेंट पारंपारिक पेट्रोलवर चालवण्यात येणाऱ्या गाड्यांप्रमाणेच गंध देईल असे कंपनी म्हणते. फक्त पेट्रोलसारखा वास येण्याऐवजी नवीन प्रीमियमचा सेंट फ्यूज स्मोकी अ‍ॅकार्ड, रबरचे पैलू आणि एक ‘प्राणी’ घटक देखील मिसळेल असे म्हटले जात आहे. २०२१ च्या गूडवुड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये मस्तांग माच-ई जीटीच्या युरोपियन पदार्पणाबरोबरच हे रिव्हील झाले आहे. या सेंटवरती एक सर्वेक्षणही केलेलं आहे.

नक्की पाहा >> Video : …अन् पाण्याच्या लाटेप्रमाणे पुरामुळे जमीनच वर आली

काय सांगत सर्वेक्षण?

फोर्डने केलेल्या सर्वेक्षणानुसार, पाचपैकी एका ड्रायव्हरने असे सांगितले की इलेक्ट्रिक वाहनांमध्ये स्वॅपिंग करताना पेट्रोलचा वास आम्ही मिस करतो. सर्वेक्षण अहवालात असे दिसून आले आहे की जवळपास ७० टक्के लोकांनी असा दावा केला आहे की ईव्हीएसमध्ये बदल झाल्यानंतर ते काही प्रमाणात पेट्रोलचा गंध मिस करतात. या सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, पेट्रोलचा वास वाइन आणि चीज या दोन्हीपेक्षा यादीमध्ये सगळ्यात वरती आहे.

फोर्डला आशा आहे की नवीन सेंट इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अधिक रस निर्माण करण्यास मदत करेल. अमेरिकन ब्रँडनुसारही हा सेंट ईव्ही बद्दल मिथक दूर करेल आणि पारंपारिक इलेक्ट्रिक कारच्या संभाव्यतेबद्दल लोकांना पटवून देईल अशी देखील आशा आहे. फोर्डने नवीन सेंट विकसित केला आहे, परंतु अद्याप कर बाजारात लॉंच झालेली नाही.

युफोरिया येणे

युफोरिया म्हणजे आनंदीपणाची, उत्साहाची, मानसिक दृष्ट्या समाधानी असण्याची भावना. व्यायाम करणे, हसणे, गाणी ऐकणे किंवा गाणी गाणे, डान्स करणे अशा असंख्य गोष्टींमुळे युफोरियाची अवस्था निर्माण होऊ शकते. यामध्ये काही लोकांना पेट्रोल, रॉकेल, नेटपेंट,टरपेंटाइन अशाही गोष्टींमुळे युफोरिया येतो.