30 November 2020

News Flash

Video: द्रविडच्या साधेपणावर प्रेक्षक फिदा, RCB चा प्रशिक्षक बनवण्याची मागणी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला त्याच्या शांत आणि सरळ स्वभावासाठी ओळखलं जातं. आपल्या शांत स्वभावाने द्रविड सर्वांचीच मनं जिंकतो.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडला त्याच्या शांत आणि सरळ स्वभावासाठी ओळखलं जातं. आपल्या शांत स्वभावाने द्रविड सर्वांचीच मनं जिंकतो.  साधेपणामुळे हा माजी क्रिकेटपटू नेहमीच आपल्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेतो. आता पुन्हा एकदा क्रिकेट चाहते द्रविडच्या साधेपणावर फिदा झाले आहेत.

रविवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना झाला. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेला हा सामना पाहण्यास १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड देखील पोहोचला होता. पण विशेष म्हणजे व्हीआयपी क्षेत्रात जाऊन सामना पाहण्याऐवजी द्रविडने सामान्य प्रेक्षकांमध्ये जाऊन सामना पाहिला.

सामान्यांमध्ये मॅच पाहतानाचा द्रविडचा हा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आयपीएलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला असून त्यासोबत, ‘पाहा आरसीबीला पाठिंबा देण्यासाठी कोण आलंय…द वॉल, द लिजेंड…राहुल द्रविड’ असं ट्विट केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर युजर्स पुन्हा एकदा द्रविडच्या साधेपणावर फिदा झाले आहेत. द्रविड केवळ क्रिकेटसाठी नव्हे तर जीवनभरासाठी माझा आदर्श आहे असं एका युजरने ट्विट केलंय. तर, मी केवळ द्रविडमुळेच आरसीबीला सपोर्ट करतो असं एकाने म्हटलंय. द्रविडने आरसीबीचा प्रशिक्षक बनावं अशी मागणीही अनेकांनी केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 2:59 pm

Web Title: former cricket captain rahul dravid choose normal stands vip box watch match in ipl 2018
Next Stories
1 भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर
2 खटला हरलात तर क्रिकेट खेळावंच लागेल, पाक क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी बीसीसीआयला डिवचलं
3 भारताचा ज्युनिअर हॉकी संघ युथ ऑलिम्पिकसाठी पात्र, अंतिम फेरीत मलेशियावर केली मात
Just Now!
X