20 October 2020

News Flash

क्रिकेट समालोचक आकाश चोप्राच्या एकवेळच्या जेवणाचं बिल चक्क सात लाख

मात्र आकाशच्या या ट्विटमध्ये एक गंमत दडली होती ती कोणाच्या नजरेस आली नाही.

एकवेळच्या जेवणाचं बिल चक्क लाखोंच्या घरात गेलेलं तुम्ही ऐकलंय का? पंचतारांकित हॉलेटमध्ये जेवायला गेलं तरी एकावेळच्या जेवणाचं बिल कदाचित यापेक्षा कमीच होईल. मात्र क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा याचं एकवेळच्या जेवणाचं बिल चक्क सात लाखांच्या घरात गेलं आहे. आकाशनं बिलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपण ७ लाख भरल्याचं मिश्किल ट्विट केलं आहे.

हे बिल बालीतील एका हॉटेलचं आहे. छोले, पनीर बटर, पनीर टीक्का, कुलचा असे पदार्थ त्यांनं मागवले होते. मात्र या सगळ्या पदर्थांच्या बिलाची एकूण रक्कम ६, ९९, ९३० च्या घरात होती. खरं तर एकवेळच्या जेवणासाठी इतकी रक्कम भरली म्हणून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मात्र आकाशच्या या ट्विटमध्ये एक गंमत दडली होती ती कोणाच्या नजरेस आली नाही.

हे बिल इंडोनेशियातलं आहे. तिथे १ रुपया म्हणजे २१० इंडोनेशियन रुपय्या होतो. त्यामुळे आकाशचं बिल इंडोनेशियन रुपय्याप्रमाणे सात लाख जरी दाखवत असलं तरी त्याला भारतीय मुल्यानुसार फक्त ३ हजार तीनशे रुपयेच मोजावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2018 2:29 pm

Web Title: former cricketer aakash chopra paid nearly 7 lakh for a meal indonesia
Next Stories
1 ‘आम्ही दहशतवाद्यांना टिप देत नाही’, मुस्लिम नाव असल्याने वेटरला टिप देण्यास ग्राहकाचा नकार
2 Viral Video : सनी देओलच्या डान्सचा हा व्हिडियो पाहिलात? 
3 VIRAL VIDEO : पुतिन यांना घाबरल्या मेलानिया ट्रम्प?
Just Now!
X