12 August 2020

News Flash

Video : ट्रॅक्टरवर बसून धोनी रमला ऑर्गेनिक शेतीमध्ये

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या स्पर्धेत धोनीचा संथ खेळ हा चर्चेचा विषय बनला होता. यानंतर धोनी तब्बल वर्षभर भारतीय संघाबाहेर आहे. निवड समितीने विश्वचषक स्पर्धेनंतर ऋषभ पंतला संधी देण्याचं ठरवलं. धोनी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार की निवृत्ती स्विकारणार हा अजुनही चर्चेचा विषय असतो. लॉकडाउन काळात धोनी आपली पत्नी साक्षी, मुलगी झिवासोबत रांची येथील आपल्या फार्म हाऊसवर राहतो आहे.

धोनीने याकाळात आपल्या मुलीसोबत अधिकाधीक वेळ घालवण्याकडे भर दिला. आता धोनी आपल्या फार्महाऊसवर ऑर्गेनिक शेती करण्यामध्ये रमला आहे. सोशल मीडियावर धोनीच्या ऑफिशीअल फॅन पेजपैकी एका अकाऊंटवर धोनीचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या व्हिडीओत धोनी एक राऊंड और…असं म्हणातानाही दिसतो आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता, परंतू करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं हे पुनरागमन लांबलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2020 10:06 pm

Web Title: former team india captain ms dhoni does organic farming at his ranchi farmhouse psd 91
Next Stories
1 ‘गब्बर’च्या घरी आले दोन नवे पाहुणे, सोशल मीडियावरुन दिली आनंदाची बातमी
2 “कोथिंबीर घ्या.. कोथिंबीर घ्या.. १४ रुपये.. १४ रुपये..” करणारा ‘तो’ आहे तरी कोण?
3 Viral Video : पंजाबी शेतकरी जोडप्याने गायलं लता दीदींचं गाणं; ऐकून तुम्हीही म्हणाल वाह…
Just Now!
X