29 September 2020

News Flash

अबब!…ओबामांच्या ‘त्या’ ट्विटला 2901479 ‘लाईक्स’, 1180967 ‘रिट्विट’

'ते' एक ट्विट ठरलं विक्रमी

'जन्मापासून कोणी एखाद्याच्या रंगावरून, धर्मावरून किंवा परिस्थितीवरून द्वेष करत

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी एक नवा विक्रम ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग साईटवर केला आहे.  आतापर्यंत २९ लाख १ हजारांहून अधिक ‘लाईक्स’ त्यांच्या एका ट्विटला मिळाल्यात. व्हर्जिनियामध्ये गेल्या काही दिवसांपासून जो काही तणाव आणि आंदोलन सुरू आहे त्यावरून ओबामांनी ट्विट करत जगाला एक वेगळीच दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. ट्विटच्या या मालिकेतल्या एका ट्विटनं तर त्यांनी साऱ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

त्यांनी एक फोटो शेअर केला. त्यात वेगवेगळ्या वर्णाची लहान मुलं एकत्र खेळत होती. ‘जन्मापासून कोणी एखाद्याच्या रंगावरून, धर्मावरून किंवा परिस्थितीवरून द्वेष करत नसतो.’ अशी ओळ त्यांनी या फोटोवर लिहिली. २०११ मध्ये ओबामांनी एका डे केअर सेंटरला भेट दिली होती. त्यावेळचा तो फोटो होता. त्यात विविध धर्माची, वर्णाची मुलं एकमेकांशी खेळत होती. कोणताही दुजाभाव या मुलांच्या मनाला शिवलेलाही नव्हता; पण आता मात्र सगळेच वर्णभेदाच्या चक्रात अडकले आहेत. तेव्हा ओबांमानी नेल्सन मंडेलांच्या आत्मचरित्रातल्या काही ओळी शेअर करून पुन्हा एकदा जगाला आपण कोण आहोत, याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या ट्विटला २९ लाख १४७९ हजारांहून अधिक लाईक्स आहेत. लाईक्सचा हा आकडा वाढतच चालला आहे. तर हे ट्विट ११ लाखांहूनही अधिक लोकांनी रिट्विट केलंय. हा ट्विटरच्या आतापर्यंतच्या इतिहासतला एक विक्रमच म्हणावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 11:38 am

Web Title: former us president barack obama tweet sets record most liked tweet on twitter
Next Stories
1 Video : असा दुर्मिळ योग पुन्हा कधीही जुळून येणार नाही!
2 रिलायन्स जिओचा फोन अखेर मोजक्या ग्राहकांच्या हातात
3 रिलायन्सकडून ग्राहकांना अनोखे गिफ्ट; ७० रुपयांत एका वर्षासाठी अनलिमिटेड डेटा
Just Now!
X