24 February 2018

News Flash

बिकीनीतली सनी लिऑन करतेय शेताची राखण, शेतकऱ्याची जगावेगळी ‘डोकॅलिटी’

म्हणून मी सनीचे फोटो लावले

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 14, 2018 1:19 PM

नेल्लोर जिल्ह्यातील बांदाकिंदिपल्ली गावातील ए. चेंचू रेड्डी या शेतकऱ्यानं बिकिनीतल्या सनीचे फोटो आपल्या शेतात लावले आहेत.

आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये, म्हणून शेतकरी पिकांभोवती कुंपण घालतो, दिवसरात्र डोळ्यात तेल घालून शेताची राखण करतो, पक्षांपासून रक्षण व्हावं यासाठी बुजगावणं उभारतो पण, कधी कोणा शेतकऱ्यांने पिकाचं रक्षण करण्यासाठी शेतात चक्क सनी लिऑनचा बिकीनीतला फोटो लावल्याचं ऐकलंय का? ही कल्पना करूनच तुम्हाला हसू येईल पण नेल्लोर जिल्ह्यातील बांदाकिंदिपल्ली गावातील ए. चेंचू रेड्डी या शेतकऱ्यानं बिकीनीतल्या सनीचे फोटो आपल्या शेतात लावले आहे.

त्याच्या या पोस्टरची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. आता यामगाची रेड्डी यांची डोकॅलिटी ऐकली तर मात्र दोन्ही डोक्यावर हात माराल. बिकीनीतली सनी आपल्या पिकाचं रक्षण करते असं त्याचं म्हणणं आहे. आत ते कसं? यामागचं लॉजिकही तितकचं हास्यास्पद आहे. रेड्डी यांचं शेत रस्त्यालगत आहे त्यामुळे येणारे जाणारे त्यांच्या पिकांकडे पाहतात. यामुळे लोकांची नजर पिकांना लागते आणि शेतीचं नुकसान होतं असं ते म्हणणात यावर उपाय म्हणून त्यांनी सनीचा मादक फोटो शेतात लावला आहे.

या फोटोकडे पाहून लोकांचं लक्ष विचलित होतं. ते फळांनी बहरलेल्या शेताकडे न पाहता सनीचे फोटो पाहतात त्यामुळे लोकांच्या वाईट नजरेपासून आपलं शेत वाचतं असं त्यांचं म्हणणं आहे.

First Published on February 14, 2018 1:19 pm

Web Title: framer put sunny leone photos in his farm to save his crops from people
  1. Andy Saywell
    Feb 14, 2018 at 4:13 pm
    बातमीतील थोडा मसुदा - "आता यामगाची रेड्डी यांची डोकॅलिटी ऐकली तर मात्र दोन्ही डोक्यावर हात माराल. बिकीनीतली सनी आपल्या पिकाचं रक्षण करते असं त्याचं म्हणणं आहे. आत ते कसं? यामागचं लॉजिकही तितकचं हास्यास्पद आहे." - हि बातमी त्याहून हास्यास्पद आहे. लोकसत्ता अशीच उत्तरोत्तर प्रगती करो.
    Reply