News Flash

हे आहे ‘जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक’; विमानवाहू युद्धनौकेलाही सहा फुटांपर्यंत उचलण्याची ताकद

१२ वर्षांपासून या चुंबकाची निर्मिती सुरु होती, हे चुंबक लवकरच फ्रान्समधील एका प्रकल्पात वापरण्यात येणार असलं तरी भारताशीही या चुंबकाचा खास संबंध आहे

हे चुंबक एकूण सहा वेगवेगळ्या भागांपासून बनवण्यात आलं आहे.(फोटो सौजन्य : जनरल अ‍ॅटॉमिक्स)

पारंपारिक ऊर्जा साधनांवरील भार कमी करुन स्वच्छ आणि पर्यावरणपुरक मार्गाने ऊर्जानिर्मिती करण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. अशाच एका प्रयत्नामध्ये फ्रान्सने जगातील सर्वात शक्तीशाली चुंबक तयार केलं आहे. फ्युजन रिअ‍ॅक्टरसाठी हे चुंबक तयार करण्यात आलं आहे. सूर्य ज्या पद्धतीने ऊर्जा निर्माण करतो त्याच पद्धतीने ऊर्जानिर्मितीसाठी हा चुंबकाचा वापर केला जाणार आहे.

इंटरनॅशनल थर्मोमॉलिक्युलर एक्सपिरिमेंटल रिअ‍ॅक्टर (आयटीईआर) या जगातिक स्तरावरील प्रकल्पामध्ये हे चुंबक वापरलं जाणार आहे. आयटीईआरमध्ये सूर्यामधील ऊर्जा निर्मितीप्रमाणे ऊर्जा निर्माण करण्याच्या प्रयत्न सेंट्रल सॉलेनॉइडच्या नावाच्या या चुंबकाच्या मदतीने केला जाणार आहे. हे चुंबक इतकं शक्तीशाली आहे की ते एखाद्या विमानवाहू युद्धनौकेला ६ फुटांपर्यंत उचलू शकतो. हे लोकचुंबक फ्रान्समधील केंद्रीय ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असणार आहे.

नक्की वाचा >> १५ महिन्यांमध्ये ५०० किमी चालले हे हत्ती; कळप थकून जंगलात झोपल्याचा फोटो जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

हा महाकाय चुंबकाला बिटिंग हार्ट ऑफ मशीन असंही म्हटलं जातं. या चुंबकाची संकल्पना, निर्मिती आणि रचना हे जनरल अ‍ॅटॉमिक्सने केली आहे. दक्षिण फ्रान्समधील आयटीईआरमध्ये कंपनीच्या माध्यमातूनच हे चुंबक पाठवलं जाणार आहे. करोना महामारीच्या कालावध्येही आयटीईआरसाठी आवश्यक असणारे अनेक सुटे भाग फ्रान्समध्ये आयात केले जात होते. आता जनरल अ‍ॅटॉमिक्सने सॉलेनॉइडची डिलेव्हरी दिल्यानंतर आयटीईआरमधील सन ऑन अर्थच्या प्रकल्पामध्ये फ्युजनच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती सुरु केली जाईल. जनरल अ‍ॅटॉमिक्सने जारी केलेल्या माहितीनुसार, सेंट्रल सॉलेनॉइड हे आयटीईआरमधील सर्वात मोठं चुंबक असणार आहे. हे चुंबक सहा मॉड्युल्सपासून तयार करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> करोना पॉझिटिव्ह सासऱ्याला पाठीवर घेऊन २ किमी अंतर पायी चालत सून पोहोचली रुग्णालयात; फोटो व्हायरल

आयटीईआरमधील प्रयोगात सेट्रोल सॉलेनॉइड महत्वाची भूमिका बजावणार आहे. आयटीईआरच्या प्रयोगात फ्युजनच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचा प्रयत्न असल्याने या चुंबकाच्या मदतीने आयटीईआरमधील प्लाझमामध्ये विद्युत प्रवाह निर्माण केला जाईल. यामुळे फ्युजनच्या माध्यमातून निर्माण झालेली ऊर्जा एका ठराविक मर्यादेत राहण्यास मदत होईल. या चुंबकाची उंची ५९ फूट असून रुंदीला ते १४ फूटांपर्यंत असणार आहेत. या चुंबकाचे वजन हे काही हजार टनांपर्यंत असल्याचं सांगण्यात आलंय.

या चुंबकामुळे निर्माण होणारी शक्ती ही एखाद्या एखाद्या विमानवाहू युद्धनौकेला सहा फुटांपर्यंत उचलण्यासाठी पुरेशी आहे. या चुंबकाच्या ऊर्जेची तुलना करायची झाल्यास त्यापासून निर्माण होणारी ऊर्जा ही पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीपेक्षा २ लाख ८० हजार पट अधीक असेल. या चुंबकाचा वापर करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. सहा भागांपासून हे चुंबक तयार होत असून प्रत्येक भागाच्या निर्मितीसाठी दोन वर्षांचा कालावधी लागलाय.

जगभरातील अनेक देशांनी पुढाकार घेऊन या आयटीईआर प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतलाय. ३५ वर्षांच्या करारामध्ये चीन, युरोपीयन महासंघ, भारत, जपान, कोरिया, रशिया आणि अमेरिकेचा समावेश आहे. आयटीईआरचे प्रयोग करण्यासाठी हजारो इंजिनियर्स आणि वैज्ञानिक काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 3:52 pm

Web Title: france to get worlds most powerful magnet the central solenoid it can lift aircraft carrier scsg 91
Next Stories
1 Euro Cup: रोनाल्डोच्या ‘त्या’ एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला जबर फटका; काही मिनिटांत २९ हजार कोटींचं नुकसान
2 video: मद्यप्रेमी नाही मद्यभक्त… त्याने चक्क दारूच्या बाटलीची केली पुजा; जाणून घ्या कारण
3 हे १०० रुपये घ्या आणि दाढी कटींग करुन या; महाराष्ट्रातील चहावाल्याची मोदींना मनी ऑर्डर
Just Now!
X