26 March 2019

News Flash

सावधान! केवळ १ मिनिटांत हॅक होऊ शकतं mAadhaar अॅप

सायबर सुरक्षा संशोधकाचा दावा

संग्रहित छायाचित्र

डिजिटल भारत या संकल्पनेला चालना देण्यासाठी गेल्याचवर्षी UIDAI म्हणजेच यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियानं mAadhaar अॅप लाँच केलं. हे अॅप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी केल्यानंतर प्रत्येकवेळी आधार कार्ड सोबत ठेवण्याची गरज नागरिकांना भासणार नव्हती. हे अॅप पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला होता पण हा दावा एका फ्रेंच सायबर सुरक्षा संशोधकानं फोल ठरवला आहे. हे अॅप केवळ १ मिनिटांच्या अवधीत हॅक होऊ शकतं असा दावा रॉबर्ट बॅपटिस्ट यांनी केला आहे.

mAadhaar या अँड्राईड अॅपची सुरक्षा ही पूर्णपणे कमकुवत आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअऱ केला आहे. हे अॅप असलेला एखादा फोन चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागला किंवा याचा अॅक्सेस त्याला मिळाला तर तो अगदी सहज त्याचा पासवर्ड मिळवू शकतो असं रॉबर्ट यांनी म्हटलं आहे. हे अॅप अधिक सुरक्षित व्हावं यासाठी UIDAI ‘Virtual-ID’ हे फीचर देखील आणणार आहे पण सध्या जी प्रणाली या अॅपासाठी कार्यरत आहे ती यंत्रणा अत्यंत फोल असल्याचा दावा रॉबर्ट यांनी केला आहे.

याआधीही जानेवारी महिन्यात ट्विटची मालिकाच पोस्ट करत रॉबर्ट यांनी या अॅपमधल्या त्रुटी दाखवून दिल्या होत्या. अर्थात त्याची दखल आधारनं घेत आपल्या अॅपमध्ये काही महत्त्वाचे बदल त्वरित करून घेतले होते. पण, असं असलं तरी mAadhaarच्या अॅपमध्ये काही मोठ्या त्रुटी शिल्लक आहे आणि त्यामुळे या अॅपचा गैरवापर होऊन माहिती चोरीला जाऊन शकते असं ठाम मत त्यानं आपल्या ट्विटमधून मांडलं आहे. वर्षभरात दुसऱ्यांदा रॉबर्ट यांनी या त्रुटी दाखवून दिल्या आहेत.

First Published on March 14, 2018 3:06 pm

Web Title: french cyber expert cracks official aadhaar app in 1 minute