इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्सचे  राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. वय वर्षे ३९ असलेले मॅक्रॉन तरुण नेतृत्त्वापैकी एक आहेत. तरूण वयात नेपोलियननंतर या देशाचे नेतृत्त्व करण्याची संधी मिळू शकलेले मॅक्रॉन दुसरे. या नव्या राष्ट्राध्यक्षांबद्दल अनेकांना कुतूहल आहे. व्यवसायाने ते बँकर आहेत. पण त्यांची प्रेमकाहाणी इतरांपेक्षा थोडी वेगळी आहे. इमॅन्युएल आहेत ३९ वर्षांचे तर त्यांच्या पत्नीचे वय आहे ६४ वर्षे.

इमॅन्युएल यांची पत्नी ब्रिजेट फ्रान्समधल्या एका श्रीमंत घराण्यातील. १९७४ साली त्यांचा अँड्रे नावाच्या एका बँकरशी विवाह झाला. त्यांना तीन मुलेही आहेत. ब्रिजेट ज्या शाळेत शिकवायच्या त्याच शाळेत इमॅन्युएल मॅक्रॉन शिकत होते. वयाच्या पंधराव्या वर्षी ते आपल्याच शिक्षिकेच्या म्हणजेच ब्रिजेट यांच्या प्रेमात पडले. दुसरी आश्चर्याची गोष्ट म्हणजे ब्रिजेटची मुलगी लॉरेन्सही इमॅन्युएल मॅक्रॉनसोबत एकाच वर्गात शिकायची. इमॅन्युएलच्या कुटुंबियांना आणि शाळेतील इतरांनाही लॉरेन्स आणि इमॅन्युएल यांच्यात प्रेमप्रकरण सुरू होते असेच वाटायचे. पण इमॅन्युएल यांना मात्र ब्रिजेटच आवडत होत्या. इमॅन्युएल हे शाळेतील नाटकांत अभिनय करायचे त्यावेळी आपले लॉरेन्सवर नाही तर ब्रिजेटवर प्रेम असल्याची कबुली त्यांनी दिली होती.

The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Sam Bankman Fried
 ‘क्रिप्टो सम्राट’ सॅम बँकमन-फ्राइडला २५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Body of 12 year old boy who went missing from Thakurwadi in Daighar found in Panvel
डायघर येथून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह पनवेलमध्ये

इमॅन्युएल आणि ब्रिजेट या दोघांतही २५ वर्षांचे अंतर आहे. जेव्हा ही गोष्ट इमॅन्युएलच्या कुटुंबियांना समजली तेव्हा त्यांनी तीव्र विरोध केला. त्यांनी लगेचच इमॅन्युएलचे नाव शाळेतून काढून टाकले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांची रवानगी पॅरिसला केली. पॅरिस मॅच मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत ब्रिजेट यांनी इमॅन्युएलबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. इमॅन्युएल यांनी वयाच्या १७ व्या वर्षी माझ्याशी लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती असेही त्यांनी सांगितले. २००७ मध्ये या दोघांनीही विवाह केला. ब्रिजेट यांना आधीच्या लग्नापासून तीन मुले आहेत तर त्यांना ७ नातवंडं देखील आहेत.