X

Viral : यांचा काही नेम नाही!; जिवंतपणीच मित्राच्या शोकसभेचं आयोजन

म्हणे प्रेमात मित्र शहीद झाला

‘संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र’ असं म्हणतात, पण आजच्या युगात ही म्हण तरुणांनी पुरेपुर बदलली. ‘तुमचं सगळ उत्तम सुरू असताना जो तुम्हाला संकटात नेतो तोच सच्चा बेस्ट फ्रेंड’ अशी म्हण तरुणांमध्ये प्रचलित होऊ लागली आहे आणि याचं ताज उदाहरण अनुभवायचं असेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा किस्सा वाचा. एव्हाना अनेकांपर्यंत हा किस्सा, त्याचे फोटो मीमच्या माध्यमातून पोहोचलेही असतील. आपल्या जवळच्या मित्राला गर्लफ्रेंड मिळाली म्हणून त्याच्या मित्रांनी चक्क शोकसभा आयोजित केली. एवढंच नाही तर त्यांच्या शोकसभेला येण्यासाठी त्यांनी इतर मित्र- मैत्रिणींनाही आमंत्रण दिलं.

प्रेरणादायी! IITमधील नोकरी सोडून अवलियाचे आदिवासी पाड्यात काम!

अॅडम मिनरल नावाच्या तरुणाचा हा किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आयुष्यात प्रेयसी आल्यानंतर तो आपल्या मित्रांना पुरता विसरला. साहाजिकच मुलांसोबत असं होतं. प्रेयसीसोबत वेळ घालवायला मिळावा यासाठी मित्रांना डच्चू देणं हे मुलांसाठी काही नवं नाही. अॅडमही आपल्या मित्रांसोबत असाच वागू लागला. त्याचं वागणं मित्रांना खटकलं तेव्हा गंमतीने त्याच्या मित्रांनी त्यांची शोकसभाच आयोजित केली. मित्र-मैत्रिण पोहोचल्यानंतर अॅडमदेखील आपल्याच शोकसभेत पोहोचला. आपण मित्रांशी पूर्वीसारखं वागू अशी ग्वाही जेव्हा त्याने दिली तेव्हा कुठे मित्रांनी हे सार प्रकरण थांबवलं.

अवतीभोवती अनेक कलाकारांची मांदियाळी; ‘हा’ मुलगा आहे तरी कोण?

Outbrain