News Flash

शून्य ते १८ लाख, पॉर्न इंडस्ट्रीकडे वळलेल्या या सुपरकार रेसरची सहा दिवसांतील कमाई

ऑस्ट्रेलियाची माजी महिला सुपरकार रेसर रेनी ग्रेसी हिने आपली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी पॉर्न वेबसाइट आणि फिल्ममध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

रेनी ग्रेसी

ऑस्ट्रेलियाची माजी महिला सुपरकार रेसर रेनी ग्रेसी हिने आपली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी पॉर्न वेबसाइट आणि फिल्ममध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करून तिने सहा दिवसांत २४ हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास १८ लाख रुपये कमावले आहेत. २०१५ मध्ये रेनीने Bathurst या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सुपरकार रेसमध्ये भाग घेतला होता. मात्र आर्थिक चणचण भासल्यामुळे तिला रेसिंग सोडावी लागली. अडल्ट इंडस्ट्रीकडे वळण्याची कल्पना कुटुंबीयांना दिली असल्याचंही तिने सांगितलं.

“मी माझ्या घराचं कर्ज फेडू शकत नव्हती. हे पूर्ण कर्ज भरण्यासाठी मला ३० वर्षांचा काळ लागणार होता. रेसिंग हे क्षेत्र आपल्यासाठी नाही असं मनाशी पक्क केलं आणि अडल्ट इंडस्ट्रीकडे वळण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा मी रेसिंगकडे वळणार नाही”, असं ती ‘डेली टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

“अडल्ट इंडस्ट्रीकडे वळल्यानंतर अनेक गोष्टी लीक होतील हे मला माहितीये. पण सर्व माहिती घेऊनच मी माझा निर्णय घेतला आहे,” असं ती पुढे म्हणाली. आपल्या नेहमीच्या गरजा भागवण्यासाठी मी हवे तेवढे पैसे कमावू शकत नव्हते. यामुळे अखेरीस मी पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतल्याचं रेनीने सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 1:36 pm

Web Title: from 0 to inr 18 lakhs in 6 days adult star renee gracie transformed her career by quitting supercars ssv 92
Next Stories
1 ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन रेस्टॉरंट मालकांना ७२३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
2 जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गाढवाला मिळाला जामीन
3 पैठणीचा साज थेट मास्कवर… दादरमधील उद्योजकाकडून फॅशनेबल ‘पैठणी मास्क’ निर्मिती
Just Now!
X