06 December 2019

News Flash

अबब..! ५०० वर्षांनंतरही या ठिकाणाचं घर भाडे वाढलेच नाही

पगार वाढ होऊ किंवा न होऊ मात्र दर दोन वर्षाला घराचे भाडे वाढतेच. जगभरातील लाखो लोक वाढत्या घर भाड्यामुळे त्रस्त आहेत.

पगार वाढ होऊ किंवा न होऊ मात्र दर दोन वर्षाला घराचे भाडे वाढतेच. जगभरातील लाखो लोक वाढत्या घर भाड्यामुळे त्रस्त आहेत. मात्र, गेल्या ५०० वर्षांपासून जर्मनीतीलल एका सोसायटीतील घर भाडे वाढलेच नाही. येथील लोक अजूनही वर्षाला फक्त ८८ युरो भाडे देतात. या सोसायटीचे नाव Fuggerei असे आहे.

Fuggerei नावाच्या या हाउसिंग कॉम्‍प्‍लेक्‍सची निर्मीती १५१४ मध्ये झाली होती. याची निर्मीती उद्योगपती जॅकब फगर यांनी केली होती. ही सोसायटी तेव्हा ऑग्सबर्गच्या गरीब लोकांना राहण्यासाठी बनवली होती. १४ व्या शतकांमध्ये फगर यांचे कुटुंबिय कपड्यांचा व्यावसाय करण्यासाठी येथे आले होते. त्यांच्या कुटुंबियांना ऑग्सबर्गमधील सर्वांत श्रीमंतापैकी एक म्हणून ओळखले जाते. ना त्यामुळे स्थानिकांना त्यांना ‘जॅकब फगर द रीच’ असे नाव दिले होते.

जॅकब यांनी आपली नितीमत्ता कधीच सोडली नाही. समाजाप्रती सतत जागरूक आणि मदत करण्यासाठी ते पुढे येत होते. १५१४ मध्ये लोकांसाठी त्यांनी सोसायटी बनवण्यास सुरूवात केली. १५२० मध्ये ही सोसायटी उभी राहिली.

या सोसायटीमध्ये घर घेण्यासाठी कॅथलीक धर्माचे असावे ही अट आहे. त्याशिवाय आणखी बरेच नियम आहे. येथे राहणारे ५०० वर्षांपासून हे सर्व नियम पाळत आहेत. या सोसायटीमध्ये रात्री १० नंतर संचारबंदी लागते. सर्व घराचे दरवाजे बंद केले जातात. याशिवाय, दिवसातून तीन वेळा चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करावी लागते. ‘द विंटेज न्‍यूज’ च्या वृत्तानुसार, फुगरेई येथे राहणारे लोक अजूनही वर्षाला फक्त ८८ युरो रूपये घर भाडे देतात. यामध्ये घराचा मेंटनस, चर्च मेंटनसचाही समावेश आहे.

स्थानिक लोकांच्या हवाल्याने ‘द विंटेज न्‍यूज’सांगितले की, काळ बदलला तसे संचारबंदीमधून थोडी सूट मिळाली आहे. काही नियम शिथील झाले आहेत. जर कोणी रात्री उशीरा सोसायटीमध्ये आल्यास त्याला काही युरो दंड भरावा लागतो. जगभरातील लोकांना या सोसायटीविषयी कमालीची उत्सुकता आहे. जर बाहेरील कोणी सोसायटीमध्ये आल्यास त्यालाही पैसे आकारले जातात. सोसायटीच्या दुरूस्तीपासून ते इतर सर्व खर्च जॅकब यांची कंपनी करते.

First Published on April 24, 2019 4:36 pm

Web Title: fuggerei in this truly magical place rent hasnt been raised since the year 1520
Just Now!
X