अॅपलचा बहुचर्चित असा आयफोन X लाँच झालाय. हा फोन लाँच झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत सोशल मिडियावर विनोदाचा पाऊसच सुरू झालाय. आयफोनवरच्या मीम्स आणि विनोदांनी तर सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातलाय. आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसपेक्षाही X ची सर्वाधिक चर्चा आहे. त्याचंही कारणही तसंच आहे म्हणा. X मध्ये होम बटन ऐवजी फेस आयडीचा पर्याय असणार आहे. त्यामुळे चेहरा स्कॅन करून मगच फोन अनलॉक होणार आहे. तेव्हा या फिचर्समुळे सगळेच चक्रावले आहेत. आता ज्याला दर दोन एक महिन्यांनी आपला मेकओव्हर करण्याची सवय आहे त्याचा फोन कसा अनलॉक होईल बुवा? अशा विनोदी चर्चा रंगल्या आहे.

वाचा : आयफोन ७, आयफोन ६ च्या किमतींमध्ये मोठी घट; जाणून घ्या नव्या किमती

तर दुसरीकडे याची किंमतही सर्वाधिक आहे. X ची ६४ जीबी व्हेरिएन्टची किंमत आहे ८९,००० आहे तर १२५ जीबी व्हेरिएन्टची किंमत आहे १ लाख २ हजार रुपये. साहजिकच माणसाच्या खिशाला हे फोन परवडणार नाही त्यामुळे हा फोन आला काय अन् गेला काय आपल्याला काही फरक पडत नाही. पण निदान या अॅपलवरचे विनोद वाचून तरी काही काळ चेहऱ्यावर हसू आणू, अशी मानसिकता नेटिझन्समध्ये पाहायला मिळत आहे.