जगाला असहिष्णूता, अहिंसा आणि सत्याग्रहाची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती सोमवारी देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. भारताच्या स्वांतत्र्य चळवळीत गांधींजींचे योगदान मोलाचे होते, फक्त भारतीयांसाठीच नाही तर आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी गांधीजींनी लढा दिला होता. गांधीजींची विचारसरणी मानणारा मोठा वर्ग भारत, आफ्रिकेत आहे, पण त्याचबरोबर गांधींजींना मानणारा एक वर्ग चीनमध्ये देखील आहे.

वाचा : रक्तदात्यांनो, फेसबुकच्या नव्या फिचरबद्दल आवर्जून जाणून घ्या!

गांधीजयंतीनिमित्त बिजिंगमधल्या फँगकाओडी शाळेतील विद्यार्थ्यांनी गांधींजींच्या स्मारकाला मानवंदना वाहिली. २००५ मध्ये इथल्या चाओअँग पार्कमध्ये गांधींजींचा पुतळा उभारण्यात आला होता. त्यानंतर अनेक शालेय विद्यार्थी गांधी जयंतीनिमित्त इथे येऊन गांधींजींच्या स्मारकासमोर नतमस्तक होत. स्वातंत्र्याच्या लढाईत गांधींचींचे महत्त्व मोठे होते. गांधींजींनी अहिंसेची शिकवण जगाला दिला, ही शिकवण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी, शांतता संयम मुलांनी अंगीकारावा म्हणून दरवर्षी अनेक विद्यार्थी येथे येतात. गांधीजी जरी भारतीय असले तरी ते साऱ्या जगाचे आहेत असं काही चिनी नागरिकांचं म्हणणं आहे.