News Flash

Viral Video: नुडल्स बनवण्याची गंगनम स्टाईल; तरुणीची अनोखी पद्धत पाहून नेटकरी आवाक्

तिची अनोखी स्टाईल पाहण्यासाठी लोकांनी रस्त्य्यावर मोठी गर्दी केली होती.

नवी दिल्ली : भन्नाट पद्धतीने नुडल्स बनवणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल.

स्ट्रीट फूड बनवणाऱ्या एक तरुणीची नुडल्स बनवण्याची डान्सिकल गंगनम स्टाईल पाहून सोशल मीडियावर नेटकरी अक्षरशः आवाक झाले आहेत. हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून अनेकांनी या तरुणीच्या कौशल्याचे कौतुक केले आहे.

या व्हिडिओत एक जपानी तरुणी रस्त्यावर नुडल्सची गाडी चालवताना दिसते. या ठिकाणी मोठ्या गॅसच्या ज्वाळांवर ती हटके पद्धतीने एका कढईत नुडल्स बनवते. साऊथ कोरियन संगीतकार साय याचं एक प्रसिद्ध गंगनम नावाचं गाण आहे, या गाण्यावर ताल धरत मोठ्या चमच्याला कढईच्या कानात अडकवत ती कढई वेगाने गोल फिरवत अत्यंत कुशलपणे डान्स करीत नुडल्स तयार करते. तिची ही अनोखी पद्धत पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांनी मोठी गर्दी केल्याचे आणि तिचे फोटो, व्हिडिओ घेत असल्याचे दिसत आहे.

सुरुवातीला हा व्हिडिओ टिकटॉकवर शेअर करण्यात आला होता. त्यानंतर तो इतरही सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी विविध प्रकारे या अनोख्या कलाकृतीवर आश्चर्य व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 3:25 pm

Web Title: gangnam style of making noodles people watching the young woman dance on street aau 85
Next Stories
1 तनिष्कच्या ‘त्या’ जाहिरातीला लव्ह जिहाद म्हणणं मूर्खपणाचं-भरत दाभोळकर
2 एका चिकन नगेटचा अंतराळ प्रवास!
3 अन् त्याने आकाशातील त्या गूढ ताऱ्याला खाली उतरवण्यासाठी पोलिसांना बोलावलं
Just Now!
X