‘पाणी मौल्यवान आहे, ते जपून वापरा’ असं आपण ऐकतो. पृथ्वीचा सर्वाधिक भाग पाण्याने व्यापला असला तरी पिण्यायोग्य पाणी मात्र खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणूनच पाणी जपून वापरण्याचा संदेश दिला जातो पण जर्मनीमधल्या एका माणसाने चक्क वर्षभरात आपल्या घरातील नळ सुरू ठेवून ७० लाख लिटर पाणी वाया घालवलं आहे. जेव्हा त्याचं बिल लाखोंच्या वर गेलं तेव्हा पोलिसांना शंका आली. घरात एकटी राहणारी व्यक्ती इतकं पाणी कशासाठी वापरते? हा प्रश्न पोलिसांना पडला. पोलिसांनी त्याच्या घराला भेट दिली तेव्हा तो पाण्याची नासाडी करताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला खरा पण त्याने उलट पोलिसांवरच हल्ला केला, शेवटी अश्रुधूरांच्या नळकांड्या वापरून त्याला पकडलं.

इव्हांका ट्रम्पनेही दिल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा !

वयाच्या फक्त सहाव्या वर्षी ‘तो’ वैमानिक झाला

संबधित व्यक्ती हा भाडेकरू होता. जेव्हा घरमालकाला पाण्याचं जवळपास ८ लाखांहून अधिक बिल आलं तेव्हा त्याला जबरदस्त धक्का बसला कारण नेहमीच्या बिलापेक्षा ते १०० पटींनी जास्त होतं. त्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार केली. जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा या माणसाची पाण्याची नासाडी सुरुच होती. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यात तीन पोलीस जखमी झाले. मोठ्या कष्टाने पोलिसांनी त्याला पकडले.

अखेर सलमान-संजय दत्तमधला दुरावा मिटला?