News Flash

जगातील सर्वात उंच इमारतीनंतर उंच हॉटेलचा विक्रमही दुबईच्या नावे

आजपासून हे हॉटेल खुलं होणार आहे

जगातील सर्वात उंच इमारतीनंतर उंच हॉटेलचा विक्रमही दुबईच्या नावे
हॉटेल गेवोरा हे आता दुबईतलंच नाही तर जगातील सर्वाधिक उंचीचं हॉटेल ठरलं आहे.

गंगनचुंबी इमारती, कृत्रिम बेटं, जगातील सर्वात मोठा मॉल, सोन्याची खरेदी अशा या ना त्या कारणानं दुबई जगभरातील लोकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. या देशानं पैसे आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्या देशांचा संपूर्ण कायापालट केला. तिथल्या श्रीमंतीचा थाट आणि तंत्रज्ञानाची किमया पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक दुबईला भेट देतात. जगातील सर्वात मोठी इमारत आणि जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या हॉटेलचा विक्रम या देशाच्या नावावर जमा आहे. त्यातला एक रेकॉर्ड मोडत दुबई चर्चेत आली आहे. दुबईत सर्वात मोठ्या हॉटेल गेवोराचा उद्धाटन सोहळा आज पार पडणार आहे.

सोन्याचा मुलामा दिलेली ही ७५ मजली इमारत आहेत. हॉटेल गेवोरा हे आता दुबईतलंच नाही तर जगातील सर्वाधिक उंचीचं हॉटेल ठरलं आहे. यापूर्वी जेडब्ल्यू मॅरिएट मार्किस या हॉटेलच्या नावावर हा विक्रम होता. हॉटेल गेवोरा हे जेडब्ल्यू मॅरिएट मार्किसपेक्षा केवळ एक मीटरनं उंच आहे. हॉटेल गेवोरामध्ये ५००हून अधिक आलिशान रुम्स आहेत तर आश्चर्याची बाब म्हणजे जेडब्ल्यू मॅरिएट मार्किसमध्ये १६०० हून जास्त रुम्स आहेत. पर्यटनाला अधिक चालना मिळावी यासाठी वेगवेगळे प्रयत्न येथे केले जात आहे.

बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारतही येथेच आहे. या इमारतीच्या लिफ्टने १२४ व्या मजल्यावर जाण्यासाठी ५९ मिनिटे लागतात. या व्यतिरिक्त दुबई मॉल हा जगातला सर्वात मोठा मॉलही येथे आहे. कृत्रिमरित्या तयार केलेल्या बर्फाची प्रचंड मोठी मानवनिर्मित रचना या मॉलमध्ये आहे. याचबरोबर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात दुबई शॉपिंग फेस्टिव्हल ही येथे आयोजित करण्यात येतो, त्यामुळे खरेदीसाठी विदेशी पर्यटकांची या ठिकाणाला विशेष पसंती असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2018 3:18 pm

Web Title: gevora hotel world tallest hotel open in dubai
Next Stories
1 …आणि २० लोकांनी ढकलले ३५ हजार किलोंचे विमान
2 सहकाऱ्याला फक्त एकदाच डेटसाठी विचारा, फेसबुकच्या कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम !
3 आदर्शवत! मुस्लिम कुटुंबाने दत्तक घेतलेल्या मुलाचे लग्न हिंदू पद्धतीने
Just Now!
X