News Flash

एक होते ‘पायोनिअर ट्री’

१ हजार वर्षे जूने झाड वादळात कोसळले

किती पावसाळे आले अन् गेले… लोक बदलले, विचार बदलले आजूबाजूचे सगळेच काही बदलत गेले पण ते झाड मात्र गेल्या १ हजार वर्षांपासून तिथेच होते. त्या महाकाय जीवाने वादळ वारे, वीजा, पूराचा तडाखा सारे काही झेलले पण यावेळी मात्र त्याला या संकटांशी दोन हात करता आले नाही अन् आभाळापर्यंत टेकलेला हा महाकाय वृक्ष क्षणार्धात जमिनीवर कोसळला. अन् ‘पायोनिअर ट्री’च्या फक्त आठवणीच आता स्मरणात राहिल्या.

कॅलिफोर्नियाच्या केलावेरीज बिग ट्री स्टेट पार्कमध्ये पायोनिअर केबिन ट्री होते. या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे हे झाड १ हजार वर्षे जूनं आहे. तर याची उंची तब्बल २५० मीटर उंच होती. याचा घेरच ३३ फूट होता. फक्त आणि फक्त कॅलिफोर्नियामध्ये आढळणा-या कोस्ट रेड वूड प्रजातीचे हे झाड होते. केलावेरीज बिग ट्री स्टेट पार्कमध्ये पर्यटक या झाडाला पाहण्यासाठी यायचे. १३७ वर्षांपूर्वी या झाडाचा बुंधा मधून कापण्यात आला आणि त्यातून रस्ता बनवण्यात आला. एखाद्या गुहेसारखा हा रस्ता दिसायचा. या रस्त्यातून अनेक गाड्या जायच्या. त्यामुळे हे आगळे वेगळे झाड अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनला. या झाडासोबत फोटो, सेल्फी काढण्यासाठी अनेक पर्यटक यायचे. पायोनिअर केबिन ट्री हिच पार्कची खरी ओळख होती.

पण रविवारी आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वादळीवा-याने हे महाकाय झाड कोसळले. केलावेरीज बिग ट्री स्टेट पार्कच्या अधिकृत अकाऊंटवर याचे काही फोटो शेअर करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 5:43 pm

Web Title: giant pioneer cabin tree collapse due to strom
Next Stories
1 Yahoo चे नाव बदलणार
2 Viral : प्रियकराच्या ‘बेवफाई’चे प्रेयसीने लावले गावभर पोस्टर
3 तुम्हीही रात्री चॅटिंग करता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
Just Now!
X