‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्वकाही शाहरुखने केले. आता हेच बघाना रेल्वे प्रवास असो की पुण्यातील कॉलेजला दिलेली भेट असो काय काय फंडे त्याने आजमावले आहे. ज्या ठिकाणी त्याने आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले तिथे आपल्या चाहत्यांसोबत जाऊन त्याने सेल्फी काढण्याची पुरेपुरे हौस त्याने भागवली. गेल्याच आठवड्यात पुण्यातल्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये तो ‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेला होता. अर्थात शाहरुख येणार म्हणून चाहत्यांची प्रचंड गर्दी तिथे जमली होती. शाहरुखने आपल्या चाहत्यांसोबत सेल्फी काढले यातला एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. बरं याचे कारणही फार मजेशीर आहे. शाहरुखनने जो फोटो काढला आहे त्यात एका मुलीचा फोटो आहे आणि हा फोटो पाहून सोशल मीडियावर सगळ्यांना दोनच प्रश्न पडले ते म्हणजे ‘ती कोण आहे आहे?’ आणि ‘ती सध्या काय करतेय?’

VIRAL : नाईलाजाने मुस्लिम महिलांना पडद्याआडून डॉक्टरांनी दिले व्याख्यान

‘रईस’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी शाहरुख पुण्यातल्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये आला होता. यावेळी त्याने ‘ओ जालिमा’ या त्याच्या आवडत्या गाण्यावर विद्यार्थ्यांसोबत डान्सही केला होता. मुलांसोबत मज्जा, मस्ती, धम्माल करतानाचे त्याने काही फोटोही काढले आणि हे फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. यातला एक फोटो तर खूपच व्हायरल झाला. शाहरुखच्या मागे काही मुली उभी होत्या. त्यातली ऑलिव्ह ग्रीन रंगाचा टॉप घातलेली मुलगी इतकी प्रसिद्ध झाली की ती कोण होती? आणि ती काय करतेय? याची उत्सुकताच सगळ्यांना लागून होती. पाकिस्तानचा चहावाला, नेपाळच्या भाजीवाली सारखी ही मुलगी पण ‘सोशल मीडिया सेन्सेशन’ बनली. एका फोटोने तिला इतकी प्रसिद्धी मिळून दिली की शाहरुखच्या फेसबुक अकाउंटवर  ही मुलगी कोण आहे ? असा प्रश्न असणार्या अनेक कमेंट पाहायला मिळाल्या. त्यामुळे या मुलीला नेटीझन्सने शोधून काढलं नाही तर नवलच म्हणावे लागले. या मुलीचे नाव सायमा असून ती श्रीनगरची आहे. कॉलेजच्या इव्हेंट मॅनेजमेंट टीमचा ती भाग  आहे, म्हणूनच तिला पहिल्या रांगेत उभे राहून शाहरुखला जवळून पाहण्याची संधी मिळाली. बझफिडला दिलेल्या एका मुलाखतीत तर या एका फोटोमुळे आपल्याला इतकी प्रसिद्धी मिळाली की चक्क फोन, मेसेजही येऊ लागले असेही तिने सांगितले.

VIDEO : चार दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या ‘हंगपन दादां’वर भावपूर्ण माहितीपट

त्यामुळे कधी कधी सेलिब्रिटीच्या मागे राहुन काढलेला एखादा फोटो तुम्हाला सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्ध बनवू शकतो हा तरुणाईचा फंडा कधी कधी कामीही येतो असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.

reaction