इतर सर्व नात्यांपेक्षा बाप आणि लेकीचं नात वेगळं असते हे सर्वांनाच माहित आहे. बाप-लेकींमधील प्रेमाची तुलनाच करू शकत नाही. आतापर्यंत आपण बापनं मुलीसाठी केलेल्या बाबीविषयी वाचत आलो आहे. मात्र, आज थोडा वेगळा किस्सा समोर आला आहे. १९ वर्षीय मुलीनं यकृत दान करून वडिलांचे प्राण वाचवले आहे. तिच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सध्या सोशल मीडायवर तिच्यावर कौतुकांचा पाऊस पडत आहे.

कोलकत्तामधील १९ वर्षां राखी दत्ता हिनं आपल्या बापाला यकृत दान केलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी गेल्या आठवड्यात याबाबतच ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी बाप-लेकीचा फोटोही पोस्ट केला होता. हर्ष गोयंका यांनी त्या फोटोमागील कथाही सांगितली आहे. कोलकत्तामधली १९ वर्षा राखी दत्ता या मुलीनं वडिलांना यकृताचा त्रास सुरू होता म्हणून यकृताचा ६५ टक्के भाग दान केला आहे.

या फोटोमध्ये वडिल आणि राखीच्या सर्जरीच्या खुणा दिसता आहेत. राखीनं वडिलांसोबत सर्जरीच्या खुणा दाखवत फोटो क्लिक केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. १९ वर्षांच्या राखीचं सगळेचजण कौतुक करत आहेत.

राखीनं कोणत्याही भविष्याचा विचार न करता वडिलांना आपल्या यकृताचा काही भाग दान केला आहे. तिच्या या हिंमतीचे सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. मुलीचं वडिलांवरील प्रेमाचं हे एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे.