News Flash

बिहारमध्ये विद्यार्थिनीच्या प्रवेशपत्रावर छापले अश्लिल छायाचित्र

प्रवेशपत्राचा फोटो व्हायरल

बिहारमधील कर्मचारी निवड समीतीची परिक्षा २६ फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ८ जानेवारीला हॉल तिकीट देण्यात आले

बिहारमध्ये आता एक अजबच प्रकार समोर आलाय. येथे एसएससीच्या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर चक्क अश्लिल फोटो किंवा अभिनेत्रीचे फोटो छापले गेल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एक हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मुलीचे नाव, पत्ता, जन्मतारिख यांचा उल्लेख अचूक होता मात्र त्यावर फोटो मात्र टॉपलेस अभिनेत्रीचा लावण्यात आला होता. एकूण कर्मचारी निवड समीतीच्या गतलान आणि बेजबाबदार कारभारावर आता सडकून टीका केली जात आहे.

Viral Video : मीठ चवीनुसार नाही तर ‘स्टाईलनुसार’

बिहारमधील कर्मचारी निवड समीतीची परिक्षा २६ फेब्रुवारीला होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ८ जानेवारीला हॉल तिकीट देण्यात आले. यावेळी नालंदा विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला आपल्या हॉल तिकीटवर एका अभिनेत्रीचा टॉपलेस फोटो छापलेला दिसला. या विद्यार्थिनीचे नाव आणि अभिनेत्रीचे नाव एकच आहे. त्यामुळे या बेजबाबदार कारभारावर आता सोशल मीडियावर सडकून टिका होत आहे. समीतीच्या सचिवांनी अशा शेकडो तक्रारी आल्याचे म्हटले आहे. परिक्षेला बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर अभिनेत्री, अभिनेते यांचे फोटो किंवा इतर अश्लिल फोटो छापण्यात आल्याचे समजत आहे.

वाचा : जगातील सर्वात लठ्ठ महिलेसाठी मुंबईतल्या रुग्णालयात बनवली जातेय २ कोटींची खोली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2017 7:33 pm

Web Title: girl finds topless picture on her bihar ssc admit card
Next Stories
1 Makar Sankranti 2017: दरवर्षी १४ जानेवारीलाच मकर संक्रांत का साजरी केली जाते?
2 Makar Sankranti 2017: जाणून घ्या मकर संक्रांतीचे महत्त्व
3 Makar Sankranti 2017: तुम्हाला मकर संक्रांतीविषयी ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?
Just Now!
X