20 October 2020

News Flash

हे २२ नियम पाळशील तरच बॉयफ्रेंड होशील, म्हणणाऱ्या मुलीचं रुल बुक व्हायरल!

गर्लफ्रेंडने दिलेले हे रुल बुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बॉयफ्रेंड म्हटला की मग त्याने आपल्या नियमातच वागायला हवे असे प्रत्येक मुलीला वाटते. मग तो हे करत नाही, तेच करतो अशा तक्रारीही गर्लफ्रेंडकडून करण्यात येतात. मग त्याने आपल्या नियमातच वागावे अशी तिची अपेक्षा असल्याने बॉयफ्रेंडसाठी काही नियम घातले जातात. आता हे नियम एखाद-दोन असले तर ठिक आहे. पण एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडसाठी एक रुलबुकच तयार केले आहे. यामध्ये त्याने कोणत्या गोष्टी करु नयेत याची यादीच देण्यात आली आहे. आता यामध्ये तिने नेमके काय नियम आणि अटी घातल्या आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते वाचून तुम्हाला काहीसे आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. गर्लफ्रेंडने दिलेले हे रुल बुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

त्याच्याकडे लग्न न झालेल्या एकाही मुलीचा फोन नंबर नको, त्या मुलींना त्याने सोशल मीडियावरही फॉलो करु नये, त्याने बाईकवरुन आपल्याशिवाय जाऊ नये, आठवड्यातून २ वेळाच आपल्या मित्रांना भेटावे, एकाही मुलीकडे पाहू नये, मी फोन तपासायला मागितल्यावर मला लगेच द्यावा असे नियम या मुलीने घातले आहेत. हे एकूण २२ नियम असून त्याने ते पाळावेत असेही तिने यामध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर या रुल बुकची जोरदार चर्चा सुरु आहे. गर्लफ्रेंडचा मेसेज आल्यावर त्याने १० मिनिटांत्या आत प्रत्येक मेसेजला उत्तर द्यावे असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात ही नियमावली करण्यात आलेला बॉयफ्रेंड हे नियम स्वीकारुन या गर्लफ्रेंडसोबत राहणार का असा प्रश्न आहे. हे दोघे कुठले आहेत आणि त्यांची नावे काय याबाबत मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 12:50 pm

Web Title: girlfriend make strict rule book of 22 rules for boyfriend going viral on internet
Next Stories
1 शशी थरूर यांचं मोदींवर पुस्तक, ट्विट केलं floccinaucinihilipilification…अर्थ काय?
2 कौतुकास्पद : पायलट झाल्यावर त्यानं गाववाल्यांना घडवली हवाई सफर
3 श्रीराम धनुष्य उचला आणि दहा हजार जिंका
Just Now!
X