News Flash

१० किलो सुवर्णलंकार आणि चांदीचे बुट घालणारा कानपूरमधला ‘गोल्डमॅन’

घरात अर्धा किलो सोन्याने मढवलेली खुर्ची

. कानपूरमधल्या काकादेव येथे राहणारे मनोज सिंह हे तिथले 'गोल्डमॅन' म्हणून ओळखले जातात.

पायात पाच किलो चांदीचे बुट आण सोन्याची पिस्तुल सोबत बाळगणा-या कानपूरमधल्या नव्या ‘गोल्डमॅनची’ सध्या चर्चा आहेत. कानपूरमधल्या काकादेव येथे राहणारे मनोज सिंह हे तिथले ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखले जातात.

वाचा : फुगेंचा सोन्याचा शर्ट नक्की आहे कोठे?

आपल्या सोन्या चांदीच्या आभुषणांशिवाय ते घराबाहेर पडतच नाही. जवळपास १० किलोंच्यावर सोन्या -चांदीचे दागिने घालून ते घराबाहेर पडतात. मनोज सिंह हे सोन्याचे व्यापारी आहे. त्यांच्या कुटुंबियांबद्दलही अशा अनेक गोष्टी ऐकिवात आहे. त्यांचे वडिल सोन्याची सायकल चालवायचे तर सोन्याच्या ताटातच जेवायचे अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल ऐकण्यात आहेत. त्यामुळे, वयाच्या १५ व्या वर्षांपासूनच  आपण सोन्याचे दाग-दागिने घालायला सुरुवात केली असे ते सांगतात. या गोल्डमॅनच्या श्रीमंतीचे चर्चे इतके आहेत की ते घरात ते अर्ध्या किलो सोन्याने मढवलेली चप्पल घालतात. तर ज्या खुर्चीवर बसून ते जेवतात ती खुर्चीही चार किलो चांदी आणि अर्धा किलो सोने वापरून बनवण्यात आली आहे. गळ्यात अडीच किलोची सोन्याची चेन आणि इतर दागदागिने घालून फिरणा-या मनोजला पाहायला अनेक जण गर्दी करतात. इतकेच नाही तर ते खिश्यात सोन्याची बंदुकही बाळगतात.

मनोज यांचे एकदा अपहरणही करण्यात आले होते. परंतु पोलिसांनी या अपहरणकर्त्यांना वेळीच अटक केली. या प्रसंगापासून मनोज यांनी आपल्या सुरक्षेसाठी चार बंदुकधारी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर हेच मनोज कुमार सध्या देशातून काळा पैसा बाहेर काढण्याच्या बाता करत आहे. याच वर्षी जुलै महिन्यात महाराष्ट्रातल्या गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणा-या दत्तात्रय फुगे यांची हत्या करण्यात आली होती. सोन्याचे अलंकार घालून फिरणारे दत्तात्रय फुगे हे चर्चेत होते. त्यानंतर त्यांनी साडेतीन किलो वजनाचा शर्ट स्वत:साठी तयार करून घेतला होता. या शर्टची किंमत १ कोटींहूनही अधिक होती. त्यांच्या हत्येनंतर हा शर्ट गायब झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 12:12 pm

Web Title: gold man of kanpur
Next Stories
1 मरणासन्न अवस्थेत असलेल्या कुपोषित बालकाला ‘तिने’ दिले जीवनदान
2 नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात ७० वर्षीय वृद्धाने केले मुंडन
3 नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांचा असाही फायदा झाला
Just Now!
X