Google आपला प्रत्येक दिवस आपल्या डूडलच्या सहाय्यानं वेगळा बनवत असतो. आज गुगल आपल्या डूडलच्या माध्यमातून लीप इयर साजरा करत आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस आहेत. दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस येत असतात. त्या वर्षाला लीप इयर म्हणतात.

गुगलनं आपल्या नव्या डूडलमध्ये २८, २९ आणि १ अशा तारखा लिहिल्या आहेत. आता यापुढील लीप वर्ष २०२४ मध्ये येणार आहे. लीप वर्षात ३६५ ऐवजी ३६६ दिवस असतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वांना माहित आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५.२४२ दिवस लागतात. परंतु ०.२४२ दिवसांचा कालावधी आपण दरवर्षी पकडत नाही. दर चार वर्षांची याचे मिळून २४ तास होतात. यामुळेच एक दिवस पूर्ण होत असल्यानं फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा होतो. लीप वर्षाव्यतिरिक्त फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतात.

येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिल्यांदा लीप वर्ष आलं होतं. त्यानंतर दर चार वर्षांनी लीप वर्ष येतं.