19 December 2018

News Flash

Happy Children’s Day : बालदिनी गुगल डुडलचे पंचिंग मशीनला प्राधान्य

भारतीयांकडून व्यक्त झाले आश्चर्य

गुगल कायमच आपल्या युजर्सना वेगवेगळे डूडल तयार करुन एक वेगळेच सरप्राईज देत असते. भारतातील महत्त्वाच्या घटनांनाही यामध्ये विशेष स्थान असते. आज १४ नोव्हेंबर म्हणजे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती. भारताच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा दिवस. देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांव्दारे हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी गुगलव्दारे एका अनोख्या स्पर्धेचे आयोजनही केले जाते. चाचा नेहरु यांना लहान मुले खूप आवडत. २००९ पासून भारतात गुगलतर्फे लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित कऱण्यात येते. यामध्ये जिंकलेल्या विद्यार्थ्याचे चित्र डुडल म्हणून लावण्यात येते. परंतु यावर्षी गुगलने असे न करता वेगळेच डुडल तयार केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘त्या’ मुलाला भेटण्यासाठी मोदींनी काढला खास वेळ

आता बालदिन सोडून गुगलने कोणते डुडल तयार केले आहे. याबाबत तुम्हाला उत्सुकता असेल तर. गुगल सर्च इंजिनवर जाऊन पाहा. यामध्ये तुम्हाला आपण वापरत असलेल्या पंचिंग मशिनचे चित्र दिसेल. तर पंचिंग मशिनचा शोध लागून आज १३१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे अशाप्रकारचे वेगळे डुडल तयार करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर १८८६ रोजी फ्रेडरिक या शास्त्रज्ञाने या पंचिंग मशिनचा शोध लावला. त्याची आठवण म्हणून गुगलने आज त्याचे डुडल तयार केले आहे. हे डुडलही अतिशय कौशल्यपूर्ण असल्याचे तुम्हाला दिसेल. एक कागद आणि पंचिंग मशिन वापरुन त्याला छिद्र पाडली असता त्यातून पडणाऱ्या टिकल्या यांचा वापर गुगलने केला आहे.

Viral : सांगा पाहू ‘या’ कोड्याचं उत्तर

दरवर्षी बालदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांत गुगलकडून स्पर्धा घेतली होती. दरवर्षी गुगल इंडियाकडून एक संकल्पना मुलांना दिली जाते. त्या संकल्पनेवर आधारित डुडल मुलांनी तयार करायचे असते. मागील वर्षी या स्पर्धेत पुण्याच्या अन्विता तेलंग हिने बाजी मारली. त्यामुळे गुगलच्या होमपेजवर तिने काढलेले डुडल झळकत होते. यावर्षीही अशाचप्रकारचे काहीतरी असेल. किंवा किमान लहान मुलांचे फोटो आणि त्यांच्याशी निगडीत गोष्टींचा वापर डुडलमध्ये केला असेल असे सर्वांना वाटले होते. मात्र गुगलने एक आगळीवेगळी गोष्ट आपल्या सगळ्यांसमोर ठेवली आहे.

First Published on November 14, 2017 12:34 pm

Web Title: google doodle childrens day 2017 happy bal diwas celebrates special animated doodle of punching machine