Gmail ही ई-मेलच्या जगातील सर्वात लोकप्रिय कंपनी मानली जाते. याच जीमेलला आता १५ वर्ष पुर्ण झाली आहेत. आज जगभरातील तब्बल १०४ कोटींपेक्षा जास्त लोक मोफत मिळणाऱ्या या सेवेचा लाभ घेत आहेत. अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनीअर Paul Buchheit यांनी १ एप्रिल २००४ साली Gmail चा शोध लावला. त्यानंतर गुगल कंपनीने Gmail वर कोट्यावधींची गुंतवणूक केली. सुरुवातीला Gmail फक्त इंग्रजी भाषेतच वापरता येत होते. परंतु काळागणीक त्यात अनेक सुधारणा केल्या गेल्या. आज ही सेवा जगभरातील तब्बल १०५ भाषांमध्ये वापरता येते. जीमेलमध्ये आपण १५ जीबीपर्यंत माहिती साठवून ठेऊ शकतो. शिवाय ५० एमबीपर्यंत फाईल्स आपल्या जीमेलमध्ये जोडल्या जाऊ शकतात. सामान्य युजर्ससाठी गुगलकडून देण्यात आलेली ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. तर काही कंपन्यांकडून ही सेवा पेड स्वरुपात घेतली आहे.

Gmail ने १६व्या वर्षात पदार्पण करताना Gmail युजर्ससाठी काही खास फीचर्स आणले आहेत. त्यामुळे या अपडेटेड जीमेलला आपण New Gmail असेही म्हणू शकतो. गुगलने या न्यू जीमेलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस व स्मार्ट कंपोज फीचर नव्याने जोडले आहेत. त्यामुळे युजर्सकडून पाठवण्यात येणाऱ्या ईमेलला आता आणखीन गती मिळणार आहे. तसेच आपण जीमेलच्या ऑफलाईन फीचरने इंटरनेट नसताना देखिल ईमेल पाठवू शकतो अशी सुविधा देण्यात आली आहे.

नज ( Nuge) फीचरमधून गुगलद्वारे युजर्स रिमाइंडर देण्यात आले आहे. त्यामुळे आपण कोणता ईमेल वाचला नाही अथवा कोणत्या ईमेलला रिप्लाय केला नाही त्याचे नोटिफीकेशन आपल्याला मिळतील. तसेच आणखी एक फीचर देण्यात आले आहे ज्यामध्ये एखाद्याला ई-मेल पाठवण्याची वेळ सुद्धा ठरवता येणार आहे. ज्याप्रमाणे फेसबुक, वर्ड प्रेस व लिंकडीनमध्ये आपण एखादी पोस्ट शेड्युल्ड करतो त्याप्रमाणे जीमेलमध्येसुद्धा आत आपण हव्या त्या वेळेनुसार इमेल शेड्युल्ड करुन ठेऊ शकतो. या फिचरमुळे आपल्याला हव्या त्या वेळेला आपण ई-मेल पाठवू शकतो. आपल्याला कोणाला इमेल पाठवायचा आहे हे आता लक्षात ठेवण्याची गरज नाही. या अफलातुन फिचर्समुळेच आज जीमेल जगातील सर्वात लोकप्रिय इमेल सुविधा मानली जाते.