News Flash

जाणून घ्या २०१७मध्ये भारतीयांनी गुगलवर काय शोधले?

गुगलने जाहीर केली टॉप सर्च ट्रेण्डसची यादी

अनेक प्रश्नांची उत्तरे गुगलवर शोधण्याकडे भारतीयांचा कल

गुगलने २०१७ मध्ये भारतीयांनी काय सर्च केले याबद्दलचा अहवाल जाहीर केला आहे. प्रमुख्याने How to आणि  What is या दोन शब्दांनी सुरुवात होणारे अनेक प्रश्न भारतीयांनी यंदा गुगलवर सर्च केले. त्यातही बातम्या, गाणी, सिनेमा संदर्भात माहिती मिळवण्यासाठी गुगलची मदत घेतली. How to link Aadhaar card with PAN Card हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक सर्च झालेला प्रश्न होता. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाला How to Book Jio phone आणि तिसऱ्या How to buy bitcoin in India हा प्रश्न आहे. मागील काही आठवड्यांपासून बिटकॉइन्सबद्दलच्या चर्चांना उधाण आल्यापासून या यादीमध्ये बीटकॉइन्ससंदर्भातील माहिती शोधण्याचे प्रमाण वाढले आहे.

सरकारने बँकांची खाती, पॅनकार्ड, मोबाईल नंबर यासारख्या अनेक महत्वाच्या गोष्टी ‘आधार’ला लिंक करणे बंधनकारक केल्याने या संदर्भातील How to ने सुरु होणारे प्रश्न सर्चमध्ये अव्वल स्थानी राहिले. रिलायन्सच्या जिओ फोनबद्दलही नेटकऱ्यांना विशेष भुरळ घातल्याचे गुगलची आकडेवारी सांगत आहे. जिओ फोनबद्दलची माहिती आणि त्याची बुकिंग कशी करायची याबद्दलचे अनेक प्रश्न भारतीयांनी यंदा गुगलवर सर्च केले.

What is GST हा प्रश्न What is ने सुरु होणाऱ्या भारतीयांनी सर्च केलेल्या प्रश्नांच्या यादीत अव्वल स्थानी राहिला. जीएसटी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी अनेकांनी गुगलची मदत घेतल्याचे दिसून येते. What is ने सुरु होणाऱ्या प्रश्नांच्या यादीमध्ये What is Jio Prime हा प्रश्न सहाव्या क्रमांकावर तर What is Ransomware हा प्रश्न दहाव्या क्रमांकावर राहिला. जगभरातील ७४हून अधिक देशांमधील ४५ हजारहून अधिक संगणकांमध्ये पसरलेल्या व्हायरसबद्दल भारतीयांनीही मोठ्याप्रमाणात गुगल सर्च केल्याचे या अहवालातून दिसून येते. तर सातव्या क्रमांकाला What is Cassini आणि What is Lunar Eclipse हा प्रश्न नवव्या क्रमांकावर राहिला.
एकंदरीतपणे गुगल इंडियाचा विचार केल्यास गुगल सर्चवर ‘बाहुबली २’ हा सर्च अव्वल स्थानी राहिला, तर दुसऱ्या क्रमांकावर आयपीएल संदर्भातील माहिती नेटकऱ्यांनी शोधली. त्याशिवाय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि सीबीएसी निकाल हे या एकंदरीत यादीमध्ये अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिले.

बातम्यांसंदर्भातील सर्चमध्ये जीएसटी, उत्तर प्रदेश निवडणूक आणि अर्थसंकल्प अव्वल स्थानी राहिले.
‘मुबारका’ सिनेमातील ‘हवा हवा’, ‘बादशाओ’ सिनेमातील ‘मेरे रश्के कमल’, ‘स्पॅनिश गाणे डेस्पॅसिटो’ आणि ईडी शेरेनचे ‘शेप ऑफ यू’ ही गाणी आणि त्या संदर्भातील माहिती भारतीयांनी सर्वाधिक वेळा सर्च केल्याचे गुगलचा अहवाल सांगतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 11:07 am

Web Title: google india announces top results of 2017 see what was trending in 2017 in india
Next Stories
1 Video : अन् भावूक झालेल्या चाहत्यानं मैदानातच धोनीच्या पायांना केला स्पर्श
2 २०१७ मध्ये इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेला शब्द माहितीये का?
3 Video : तिनं मृत्यूला दोनदा दिली हुलकावणी
Just Now!
X