News Flash

Google Maps ला केले ‘हॅक’, मोकळ्या रस्त्यावर झालं ‘ट्रॅफिक जॅम’

गुगलसोबत झाला जबरदस्त 'प्रँक'

(PC - YouTube/Simon Weckert)

गुगलसोबत एक ‘प्रँक’ झाला आहे. बर्लिनच्या सिमॉन वेकर्ट या एका आर्टिस्टने 99 सेकंड-हँड स्मार्टफोन्सच्या मदतीने Google Maps ला हॅक केले. मस्करी म्हणून केलेल्या या हॅकिंगनंतर गुगल मॅप्सवर अगदी मोकळ्या रस्त्यावरही प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं दाखवलं जात होतं.

युजर्सना ट्रॅफिकची माहिती देण्यासाठी गुगलकडून, स्लो मुव्हिंग किंवा हेवी ट्र्रॅफिकचा डेटा मिळवला जातो. यासाठी विशेष परिसरात प्रवास करणाऱ्या आणि गुगल मॅपचा वापर करणाऱ्या युजर्सचा मोबाइल अ‍ॅक्सेस केला जातो. सिमॉनने ट्रॅफिक जॅमची माहिती देणाऱ्या गुगलच्या याच प्रोसेससोबत ‘गेम’ केला.

सिमॉनने एका छोट्या हँड ट्रॉलीमध्ये 99 स्मार्टफोन्स ठेवले. या सर्व स्मार्टफोन्समध्ये Google Maps ऑन होते. सर्व स्मार्टफोन्स एकत्र ठेवलेली ट्रॉली घेवून सिमॉन मोकळ्या रस्त्यावर फेरफटका मारण्यासाठी निघाला. गुगलला सिमॉनचा हा ‘प्रँक’ अजिबात समजला नाही आणि मोकळ्या रस्त्याला ‘हेवी ट्रॅफिक’चा रस्ता म्हणून दाखवायला सुरूवात केली. या प्रँकमुळे कोणाला नुकसान झालं नाही पण मॅप्सचा वापर करुन त्या रस्त्याने जाणाऱ्या चालकांना गुगलने री-रूट नक्कीचे केले.

ट्रॅफिकसाठी तीन रंग:
जगभरात Google Maps ही नेव्हिगेशन सिस्टिम लोकप्रिय आहे. गुगल मॅप्समध्ये ट्रॅफिकची माहिती देण्यासाठी भारतात लाल, निळा आणि पिवळ्या रंगांचा वापर होतो. लाल म्हणजे प्रचंड वाहतूक कोंडी, थोडीफार ट्रॅफिक म्हणजे पिवळा आणि एकदम मोकळा रस्ता म्हणजे निळा रंग. आजकाल रस्ता माहिती असूनही अनेकजण गुगल मॅप्सचा वापर करतात जेणेकरुन त्यांना रिअल-टाइम इन्फॉर्मेशन मिळावी. या हॅकिंगनंतर गुगल मॅप्सवर पूर्णपणे विश्वास ठेवण्याआधी युजर्स विचार नक्कीच करतील. तसेच, हा प्रँक होता पण मॅप्समधील उणिवेचा गैरवापर होऊ शकतो हे गुगलला दर्शवणारा हा अलर्टही होता.

पाहा व्हिडिओ –

या हॅकिंगनंतर गुगल मॅप्सवर पूर्णपणे विश्वास ठेवण्याआधी युजर्स विचार नक्कीच करतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 11:43 am

Web Title: google maps hacked or fooled by man who used 99 smartphones to create a fake traffic jam sas 89
Next Stories
1 कुणाल कामराने राज ठाकरेंसाठी घेतला वडापाव , कारण…
2 तुमच्यासाठी कायपण ! जाणून घ्या न्यूझीलंडने खेळाडू गुलाबी रंगात रंगण्याचं कारण
3 हवा होता युवराज, पदरात पडला ब्रॉड ! महागडं षटक टाकणारा शिवम दुबे ट्रोल
Just Now!
X