तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी गुगलवर ‘Idiot’ सर्च केल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत होता. आता गुगलवर ‘भिकारी’ असे सर्च केल्यास चक्क पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दाखविला जात आहे.

गुगलवर उर्दूमधून भिकारी सर्च केल्यास इमरान खान यांचा फोटो दाखविण्यात येत आहे. इम्रान खान यांनी याबाबत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना नोटीस पाठवली आहे. याशिवाय, पंजाब प्रांतातील विधानसभेमध्ये एक प्रस्ताव आणण्यात आला आहे. यामध्ये गुगल सीईओ सुंदर पिचाई यांना समन्स पाठविण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या एका दिग्गज पत्रकाराने इमरान खान आणि या प्रस्तावाचा फोटो शेअर केला आहे.

 पण प्रत्येकाला भिकारी सर्च केल्यास इम्रान खान यांचा फोटो का येतो? हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. या उत्तरासाठी आपल्याला गुगल कशा पद्धतीने सर्च करते हे समजून घेणं महत्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प प्रकरणी पिचाई यांनी स्पष्टीकरणात म्हटले होते की, गुगलचे सर्च इंजिन अल्गोरिदम आणि रिझल्ट देण्यासाठी अनेक फॅक्टर काम करत असतात. यानंतर मिळत्या-जुळत्या विषयांशी, प्रसिद्धी आदींचे विश्लेषण करून चांगले रिझल्ट देते.

गुगलचे सर्च इंजिन अल्गोरिदम असे काम करते –
आपण जेव्हा या सर्च इंजिनमध्ये एखादा शब्द टाइप करतो त्याच वेळेस ही संगणक प्रणाली किमान १०० कोटी वा कमाल कितीही अशा शब्दांच्या समूहांना २०० निकषांची चाळणी लावतो. हे दोनशे घटक असतात संदर्भ, लोकप्रियता, कालसापेक्षता, सदर शब्द आधी कोणाकोणाच्या संदर्भात वापरला गेलाय.. वगैरे अनेक. त्यांतनं चाळण लागून मग काही पर्याय समोर येतात. ते जवळपास अचूक असतात. कारण इतके शब्द आणि त्यांच्या छाननीचे निकष याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं.