News Flash

गुगलची प्लास्टिकमुक्तीकडे वाटचाल; पाच वर्षांत प्लास्टिक पॅकेजिंग पूर्णपणे करणार बंद

पिक्सेल ५ या मोबाईलचे बॅक कव्हर पूर्णपणे प्लास्टिक फ्री

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बडी कंपनी असलेल्या गुगलने प्रॉडक्ट पॅकेजिंग शंभर टक्के प्लास्टिक फ्री आणि पुनर्वापर करण्यायोग्य करण्याची प्रतिज्ञा केली आहे. यासाठी सन २०२५ पर्यंत हळूहळू हा बदल करण्यात येणार आहे.

गुगलने सोमवारी एका घोषणेद्वारे स्पष्ट् केले की, “गुगलच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या पिक्सेल ५ या मोबाईलचे बॅक कव्हर हे पूर्णपणे पुनर्वापर करण्यायोग्य अॅल्युमिनिअम पासून तयार करण्यात आलं आहे.” यापुढेही आम्ही आमच्या प्रॉडक्ट्सची डिलिव्हरी ही शंभर टक्के कार्बन फ्री करणार आहोत, असंही गुगलने म्हटलं आहे.

“सन २०१६ पासून आम्ही प्लास्टिकचा वापर कमी करण्यास आधीच सुरुवात केली आहे. मात्र, प्लास्टिक मुक्तीचं हे ध्येय गाठण्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे. यासाठी आम्हाला पॅकेजिंगसाठी प्लास्टिकला पर्याय शोधावा लागेल तसेच पुनर्वापर होणारं मटेरियल आमच्या प्रॉडक्टचं संरक्षण करेल याची काळजीही घ्यावी लागेल,” गुगलचे स्टॅबिलिटी सिस्टिम आर्किटिक्ट डेव्हिड बोर्न यांनी ही माहिती दिली.

गेल्यावर्षी गुगलने हे वचन दिले होते की, त्यांची सर्व प्रॉडक्ट्स सन २०२२ पर्यंत पुनर्वापर करता येईल अशा पदार्थांपासून बनवण्यात येतील. त्यानुसारच यंदा नव्याने बाजारात दाखल झालेला गुगला पिक्सल फोन आणि इतर नवे प्रॉडक्ट्स हे रिसायकल मटेरियलपासून बनवले आहेत. नव्या नेस्ट ऑडिओमध्ये ७० टक्के रिसायकल प्लास्टिक आहे. तर नेस्ट थर्मोस्टॅटमध्ये ट्रिम प्लेट आहेत ज्या ७५ टक्के रिसायकल झालेल्या प्लास्टिकपासून बनवण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 1:11 pm

Web Title: google to make its product packaging plastic free by 2025 aau 85
Next Stories
1 शेजारी लग्नाला आलेली स्थळं परत पाठवत होता, तरुण जेसीबी घेऊन पोहोचला आणि….
2 Fact Check : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी न मिळाल्यानंतर रोहितने ट्विटर Bio बदलला?? काय आहे सत्य…
3 हैदराबादच्या ज्वेलर्सचा जागतिक विक्रम; अंगठीमध्ये केला तब्बल ७,८०१ हिऱ्यांचा वापर
Just Now!
X