News Flash

‘गावानं नाकारलं पण…देश स्वीकारणार’, फक्त १२ मतदारांचे मानले जाहीर आभार; पराभूत उमेदवाराचे अजब बॅनर

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत होऊनही 'तो' जिंकला...!!

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला. अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला. तर ज्यांचा विजय झाला, त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष केला. पण लातूरच्या एका तरुण उमेदवाराने मात्र पराभवानंतरही संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. यासाठी कारण ठरलंय ते म्हणजे पराभवानंतर त्याने लावलेलं एक बॅनर.

लातूर तालुक्यातील जळकोट येथील कोनळी डोंगरी ग्रामपंचायतीच्या विकास शिंदे कोनाळीकर या तरुणाने निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चक्क मतदारांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे अवघी १२ मतं पडूनही त्याने बॅनरबाजी केलीये.

‘वाटलं होतं गड्या आपला गाव बरा…पण तुम्ही म्हणालो पसारा भरा. आम्ही जातो आमच्या गावा… आमचा राम राम घ्यावा. समाजन धिक्कारलं… गावानं नाकारलं… पण आम्हाला देश स्वीकारणार…! आमच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या… बारा मतदारांचे जाहीर आभार…! ना जातीसाठी… ना धर्मासाठी… आमचा लढा मातीसाठी… जगेन तर देशासाठी… मरेन तर देशासाठी. मला ज्यांनी बारा मते देऊ संघर्ष करण्याचे ताकद दिली त्यांचे सात जन्मही उपकार फिटणार नाही. तुमच्या मताचे देशात नाव करीन. खंडेराया नगरीचे पराभूत उमेदवार विकास शिंदे कोनाळीकर’ अशा आशयाचं हे बॅनर आहे.

विकास शिंदे कोनाळीकार याचं अहमदपूर इथं पॉलिटेक्निकचं शिक्षण सुरू असून पुण्यात तो काही काळासाठी राहत होता. त्यानंतर गावाचा विकास करण्यासाठी त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे ठरवले. पण यामध्ये योग्य राजकीय कसबही लागते याची जाणीव त्याला ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर झाली. ग्रामपंचायत निवडणुकीत त्याला अवघी बारा मतंच मिळाली. पण पराभवानंतरही मतदान करणाऱ्या १२ मतदारांचे आभार मानल्यामुळे तो सोशल मीडियावर हिरो ठरतोय. त्याने बॅनरमुळे सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 2:13 pm

Web Title: gram panchayat election 2021 latur defeated candidate puts banner to thank 12 voters winning hearts on social media sas 89
Next Stories
1 …म्हणून गब्बर सिंगला झाली शिक्षा; UP पोलिसांनी Video शेअर करत सांगितलं कारण
2 लग्नाच्या हॉलवर पाहुण्यांसाठी ठेवला Maggi Counter; अनेकांनी केलं या भन्नाट कल्पनेचं कौतुक
3 लॉटरी विक्रेताच झाला करोडपती; न विकल्या गेलेल्या तिकीटालाच लागली १२ कोटींची लॉटरी
Just Now!
X