02 December 2020

News Flash

Viral Video : मालिका पाहताना आजी चिडल्या अन्…

पाहून तुम्हालाही येईल हसू

टीव्ही म्हणजे अनेक कुटुंबातील एक महत्त्वाचे माध्यम आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळेच टीव्हीवरील आपल्या आवडत्या गोष्टी पाहत असतात. वयस्कर लोकांसाठी तर टीव्ही हे घरबसल्या मनोरंजन करणारे एक मुख्य साधन असते. यामध्ये टीव्ही मालिका हा जवळपास सर्वच कुटुंबात पाहिला जाणारा मनोरंजनात्मक कार्यक्रम समजला जातो. एकदा मालिका लावल्या की पुढचा बराच काळ वयस्कर लोक त्यापुढे अगदी सहज रमतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. नुकताच फेसबुकवर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक आजी टीव्हीमधील मालिका पाहून त्यावर एकट्याच प्रतिक्रिया देत असल्याचे दिसत आहे.

लहान मुले आणि वयस्कर लोक एकसारखेच असतात याचा प्रत्यय यानिमित्ताने आला आहे. पांढरी साडी घातलेल्या या आजीच्या हातात त्यांची काठी आहे. या आजी मालिका बघण्याच्या नादात थेट टीव्हीसमोर उभ्या असल्याचे आपल्याला या व्हिडीयोमध्ये दिसत आहे. या आजी मालिकेतील संवाद ऐकून त्यावर चिडत असल्याचे दिसत आहे. काही वेळा तर त्या आपली काठीही टीव्हीकडे नेतात तेव्हा आता त्या रागाने टीव्ही फोडणार का असेही आपल्याला वाटते. महिलावर्ग अनेकदा टीव्हीतील घटना आपल्या आयुष्याशी जोडतात. त्यामुळे या आजीही त्याचपद्धतीने प्रतिसाद देत असल्याचे दिसते.

या व्हिडीयोमधील भाषा आपल्याला नेमकी लक्षात येत नसली तरीही तो व्हिडीयो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. Only shetty are allowed या फेसबुक पेजवर सुकेश शेट्टी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. ८,६१२ जणांहून अधिक लोकांनी तो शेअर केला असून ४,५०० जणांनी तो लाइक केल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील गमतीजमतींमध्ये दिवसेंदिवस भरच पडत असल्याचे आपल्याला दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 5:13 pm

Web Title: grandmother watching tv serial get angry on tv viral video on facebook
Next Stories
1 ‘या’ देशात तब्बल ३५ वर्षांनंतर चित्रपटगृह पुन्हा होणार सुरू
2 अंत्ययात्रेसाठी सोन्याची शवपेटी, मृतदेहावर ६५ लाखांचं सोनं आणि बरंच काही
3 काळवीट शिकार : एक असा आरोपी, ज्याला २० वर्षांनंतरही नाही पकडू शकले पोलीस
Just Now!
X