29 September 2020

News Flash

उतावळा नवरा… खांद्याला गोळी लागली असतानाही चढला बोहल्यावर

वरात घेऊन मुलीच्या घरी जात असताना मुलावर झाला गोळीबार

लग्न आणि त्यातही लग्नाची वरात ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट. दिल्लीतील २५ वर्षीय बादल याच्यासाठी मात्र ही घटना काहीशी विचित्र ठरली. वरातीत असतानाच नवरदेवावर अज्ञातांकडून गोळीबार झाला. आता गोळीबार झाला म्हटल्यावर त्याची काय अवस्था झाली असेल हे वेगळे सांगायला नको. त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या उजव्या खांद्यावर गोळी लागली असल्याने त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर तीन तास तातडीचे उपचार सुरु होते. या उपचारांनंतर हा वर लग्नमंडपात आला आणि त्याने लग्नाचे विधी पूर्ण केले असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना रात्री १० वाजता दिल्लीमध्ये घडली. वरात लग्नमंडपापासून ४०० मीटर दूर असताना वरावर अचानक गोळीबार झाला. त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी वरातीत नाचण्यात मग्न होते, त्यावेळी ही घटना घडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. सुरुवातीला काय झाले हे मला समजले नाही. मात्र तो खाली पडला आणि त्याच्या डाव्या खांद्याच्या बाजूने रक्त यायला लागल्यावर नेमके काय झाले हे आजुबाजूच्यांना समजले. या प्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे अज्ञात हल्लेखोर हिरोहोंडावर आले होते असे वरातीत उपस्थित असलेल्यांनी सांगितले.

हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी आपली बाईक बाजूलाच पार्क केली होती. त्याद्वारे त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. नवरदेवाचे कोणाशी वैर आहे किंवा तो अशाप्रकारच्या कोणत्या घटनांमध्ये सहभागी आहे याचा शोध पोलिस घेत आहेत. लग्नाचे विधी पूर्ण केल्यानंतर या वराला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबार झाल्यानंतर त्याच्या उजव्या खांद्यामध्ये अडकलेली गोळी काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:15 pm

Web Title: groom in delhi returns to complete wedding rituals with bullet in shoulder
Next Stories
1 जाणून घ्या PUBG च्या Season 4 विषयी…
2 5 लिटर Free पेट्रोल देतंय एसबीआय !
3 अंतराळातून असा दिसतो ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’
Just Now!
X