News Flash

Video: नवरीचे बहिणीच्या नवऱ्याशी संबंध; नवरदेवाने लग्नातच दाखवला अश्लील व्हिडीओ

हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय़ ठरत आहे

नवऱ्यानेच दाखवला व्हिडिओ

लग्नाच्या दिवशी लग्न मंडपात नवदाम्पत्याचे ‘प्री वेडिंग फोटोशूट’ किंवा जुने फोटो दाखवण्याचा ट्रेण्ड सध्या दिसत आहे. मात्र चीनमधील एक लग्न वेगळ्याच व्हिडीओसाठी चर्चेत आलं आहे. या लग्नामध्ये नवऱ्या मुलाने नवरीचं बिंग फोडण्यासाठी चक्क तिचे बेडरुममधील काही व्हिडीओ उपस्थित पाहुण्यांसमोर मोठ्या पडद्यावर दाखवले. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणीचे ज्या व्यक्तीबरोबर संबंध होते ती व्यक्ती या तरुणीचे भाऊजीच निघाले.

मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील फुजियान प्रांतमधील लग्नात हा सर्व प्रकार घडला. आपल्या होणाऱ्या पत्नीचे तिच्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर शारीरिक संबंध असल्याची माहिती लग्नाच्या काही दिवस आधी या तरुणाला लागली. त्यामुळे या तरुणीला अद्दल घडवण्यासाठी तरुणाने त्यांच्यासाठी घेतलेल्या घरामध्ये छुपे कॅमेरे बसवले होते. तरुणाच्या अपेक्षेप्रमाणे ही तरुणी आपल्या भाऊजींबरोबर याच घरातील बेडरुममध्ये शारिरीक संबंध ठेवताना कॅमेरात कैद झाली. या दोघांचा हाच व्हिडिओ नवऱ्या मुलाने लग्नाआधी मोठ्या स्क्रीनवर प्ले केला. लग्नाच्या हॉलमध्ये अचानक नवरी मुलगी आणि तिच्या भाऊजींचा हा व्हिडीओ सुरु झाल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. “तुला काय वाटलं मला ठाऊक नव्हतं,” असं म्हणत त्याने या तरुणीकडे पाहिले. त्यानंतर तरुणीने हातातील पुष्पगुच्छ नवऱ्या मुलाला फेकून मारला. मात्र मंचावरील नातेवाईकांनी या दोघांचे भांडण थांबवले. या स्टेजवरील भांडणाचा व्हिडिओही सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

चीनमधील सोशल नेटवर्किंग साईटवर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दोन वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. सहा महिन्यापूर्वीच त्यांचे लग्न ठरलं होतं. मात्र दरम्यानच्या काळात या तरुणीचे बहिणीच्या नवऱ्याबरोबरच संबंध असल्याची धक्कादायक माहिती या तरुणाला मिळाली. या तरुणीची बहीण गरोदर असताना तिचा नवरा मेहुणीसोबत शारिरीक संबंध ठेवत असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर तरुणाने या दोघांचा भांडाफोड करण्यासाठी लग्नामध्ये हा व्हिडीओ लावला आणि सर्वांना धक्काच बसला.

या व्हिडीओची जोरदार चर्चा असली तरी हा सर्वप्रकार एक नियोजित प्रमोशनल अॅक्टीव्हीटी होती असाही दावा चीनमधील काही ब्लॉगर्सने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 9:48 am

Web Title: groom plays video of cheating bride naked in bed with her brother in law on wedding day scsg 91
Next Stories
1 Viral Video : दारु पिऊन तरुणाने मारल्या नागाशी गप्पा
2 Video : गरोदर स्त्रीसाठी नवराच झाला खुर्ची!
3 Video : आगीतून वाचवले अस्वलाच्या पिल्लाचे प्राण; पुढे जे झालं ते वाचून व्हाल भावूक
Just Now!
X