03 March 2021

News Flash

या कारणासाठी GUCCI हजारो रुपयांना विकतंय मळलेले बूट

किंमत ऐकून व्हाल थक्क

चप्पल आणि बूट यांसाठी बरेच जण क्रेझी असतात. कधी रस्त्यावरुन चप्पल खरेदी करण्यापासून ते महागड्या ब्रँडच्या चप्पल खरेदी केल्या जातात. सध्या कॅज्युअल आणि स्पोर्ट शूजबरोबरच कॅनव्हास शूजचाही ट्रेंड आहे. यामध्ये आता GUCCI या आंतरराष्ट्रीय ब्रँडने आणखीन एक नवीन ट्रेंड आणला आहे. यामध्ये कंपनीकडून मळलेले शूज विकले जाणार असून या ट्रेंडचे नाव कंपनीने Dirty Shoes असे ठेवले आहे. नामांकित ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ब्रँडने आपल्या नवीन कलेक्शनमध्ये या शूजचा समावेश केला आहे. शाळेत वापरल्या जाणाऱ्या शूजवरुन या शूजची डिझाइन घेण्यात आली असून त्याला स्क्रीनर स्निकर असे म्हणण्यात आले आहे. आपण शूज घातल्यावर ते मळतात, मग ते धुवावे लागतात. असे होऊ नये म्हणून कंपनीने हे मळलेले शूज बाजारात आणले असावेत.

या शूजला विंटेज इफेक्ट देण्यात आला असून त्याला ऑफव्हाईट रंग देण्यात आला आहे. तसेच त्यासाठी पॉलिश नसलेले लेदर वापरण्यात आले आहे. आता या मळलेल्या शूजची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. हे शूज ६१५ पाऊंड म्हणजेच भारतीय चलनात ५७,०७८ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहकांना हे शूज कंपनीच्या अधिकृत दुकानात किंवा ऑनलाईन खरेदी करता येतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर या शूजच्या किमतीवरुन जोरदार चर्चा रंगली असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:01 pm

Web Title: gucci dirty shoes price screener sneakers twitter trolled
Next Stories
1 ज्युनिअर इंजिनीअरच्या परीक्षेत सनी लिओनी टॉपर
2 हिंदू धर्मग्रंथ वाचून शांतता मिळते, अमेरिकन ऑलिम्पिकपटूने दिली कौतुकाची पावती
3 कोहिनूरपेक्षा दुप्पट मोठा हिरा भारतात, किंमत ४०० कोटी
Just Now!
X