X

सोशल मीडियावर उत्साहाची गुढी

गुढीपाडवा ट्रेंडमध्ये, मोदी, ममता बॅनर्जींनी दिल्या शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाला सुरूवात झाली, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि हिंदूच्या या नवर्षांचे महराष्ट्रात जल्लोषात स्वागत केले जात आहे. अनेक ठिकाणी नववर्षांच्या स्वागतासाठी स्वागतयात्रा काढण्यात आल्या आहेत. ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर देखील या नववर्षाचे जंगी स्वागत होत आहे. सकाळपासूनच ट्विटरवर नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे. #GudiPadwa2017, #गुढीपाडवा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले आहेत. मोदींपासून ममता बॅनर्जी, राज्यवर्धन सिंह राठोड, वसुंधरा राजे, विजेंदर सिंह या सगळ्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर अकाऊंटवरून महाराष्ट्रातील जनतेला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्रातील जनतेला गुढीपाडव्याच्या या खास मुहूर्ताच्या शुभेच्छा. आगामी वर्ष तुमच्यासाठी आनंदी, निरोगी आणि भरभराटीचे ठरो’, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. दरम्यान, आज गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील अनेक भागांमध्ये उत्साह दिसत आहे. गिरगाव, ठाणे आणि डोंबिवली शोभायात्रांना सुरूवात झाली आहे. तर सिद्धीविनायक, मुंबादेवी काकड आरतीला हजेरी लावून नववर्षांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे.