एका १४ वर्षांचा मुलगा काय करु शकतो असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हर्षवर्धनकडून नक्कीच आदर्श घेतला पाहिजे. या १४ वर्षाच्या मुलासोबत चक्क गुजरातच्या विज्ञान – तंत्रज्ञान विभागाने ड्रोन निर्मितीचा करार केला आहे. वायब्रंट गुजरात परिषदेत हर्ष सहभागी झाला होता. या परिषदेत त्यांनी चक्क सरकारसोबत तब्बल ५ कोटींचा सामजस्य करार केला आहे.

हर्षवर्धन झाला याच्या ड्रोन प्रकल्पाचे सध्या कौतुक होत आहे. कारण त्याच्या सोबत गुजरातच्या विज्ञान – तंत्रज्ञान विभागाने करार केला आहे. हर्षवर्धन एक ड्रोन बनवणार आहे. जे ड्रोन सरकारसाठी आणि देशासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. जमीनीत पेरलेली भूसुंरुंग शोधून ती निकामी करणारे ड्रोन तो विकसीत करणार आहे. व्हायब्रंट गुजरात परिषदेत १४ वर्षांचा हर्ष आपल्या ड्रोन प्रकल्पाचा नमुना घेऊन सहभागी झाला होता. त्याचे हे काम किती महत्त्वाचे आहे हे ओळखूनच गुजरात सरकाने त्याच्यासोबत ५ कोटींचा समांजस्य करार केला.

२०१६ पासून हर्ष यावर काम करत आहे. हा ड्रोन बनवण्यासाठी त्याला ५ लाखांच्या आसपास खर्च आला. त्याने एकूण ३ ड्रोन बनले होते त्यासाठी ३ लाख रुपयांची मदत त्याला सरकारने केली. हाताने भुसुरुंग निकामी करताना जवानांचा मृत्यू होतो ते जखमी होत असल्याचे मी टीव्हीवर पाहिले होते. त्यावेळी मला अशा प्रकारचे ड्रोन विकसित करण्याची कल्पना सुचली अशीही प्रतिक्रिया त्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिली.