News Flash

Redmi Note मालिकेतील लोकप्रिय फोनला लागली आग, नका करु ‘ही’ चूक

नका करु 'ही' चूक

(छायाचित्र सौजन्य : खबर गुजरात)

स्मार्टफोनमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता शाओमीचा लोकप्रिय स्मार्टफोन Redmi Note 6 Pro ला आग लागल्याची घटना समोर आली आहे. गुजरातमध्ये हा प्रकार घडलाय.

एका लोकल सर्व्हिस सेटरमध्ये हा फोन दुरूस्त केला जात होता, त्याचवेळी आग लागल्याची घटना घडली. इंजिनिअर फोन दुरूस्त करत असताना अचानक बॅक पॅनलमधून धूर यायला सुरूवात झाल्याचं सांगितलं जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

घटनेबाबत माहिती मिळताच शाओमीच्या प्रवक्त्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच फोन दुरुस्तीसाठी दिला जावा असं आवाहन कंपनीकडून करण्यात आलं आहे.  “घटनेनंतर आमचं एक पथक लगेच ग्राहकाकडे पोहोचलं. पण दुरूस्तीसाठी हा फोन नेण्याआधीच तो बाहेरुन ‘डॅमेज’ झाला होता. नंतर स्थानिक दुकानदाराने फोन दुरुस्त करण्याऐवजी तो अजून खराब केला. याबाबत आम्ही ग्राहकासोबत बोललोय. आम्ही सर्व ग्राहकांना अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच फोन दुरुस्तीसाठी दिला जावा असे आवाहन करत आहोत”, अशी प्रतिक्रिया कंपनीकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, फोन आधीच फिजिकली डॅमेज होता, त्यामुळेच या फोनला आग लागल्याचं सांगितलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2020 12:44 pm

Web Title: gujarat redmi note 6 pro catches fire at a service centre sas 89
Next Stories
1 एक वर्षांच्या चिमुकल्याचं नशीब चमकलं; जिंकली ७ कोटी रुपयांची लॉटरी
2 ‘कोरोना’चा उद्रेक! नवजात बाळाला जन्माच्या अवघ्या ३० तासांमध्ये लागण
3 Video: बिबट्याचा बछडा आणि सरड्याची झुंज… कोणी मारली बाजी पाहा
Just Now!
X