गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात एक कथित स्वरूपात शापित गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आडनाव सारखेच आहे. या गावात जवळजवळ सातशे लोक राहतात आणि प्रत्येकाचे आडनाव ‘चरवडिया’ असेच आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येकाला आपलं आडनाव ‘चरवडिया’ चं ठेवावं लागते. तसा या गावाला शाप आहे असे म्हटले जातेय. सातशे लोकांच्या वस्तीचे नाव बोकाडथंभा असे आहे.

असे म्हटले जाते की, काही वर्षांपूर्वी या गावात दुसऱ्या आडनावांच्या माणसांनी राहण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अनेक रोगांनी ग्रासलं. रोगाला कंटाळून त्या व्यक्तींनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. वांकानेर शहरापासून फक्त १३ किमी अंतरावर असलेल्या बोकाडथंभा या गावात चरवडिया आडनाव असल्याशिवाय राहता येत नाही.

१०० वर्षांपासून या गावात एकाच आडनावाची लोकं वास्तव्यास आहेत. चरवडिया व्यतिरिक्त अन्य आडनावाच्या व्यक्तीनं या गावात राहण्याचा प्रयत्न केल्यास त्याला शाप लागतो असे म्हटले जाते.

गावाला ग्रामपंचायतही नाही. गावातील लोक शेती करतात ती वांकानेरमधील एका राजपूत परिवाराची आहे. स्वातंत्र्यानंतर गावातील लोकांमध्ये शेती वाटण्यात आली. गावातील अनेक तरूण रोजगारासाठी शहराकडे वळले आहेत.