22 February 2020

News Flash

“तू वाचलास तरच प्रितीला वाचवू शकशील”, पोलिसांनी केलं कबीर सिंगला ट्रोल

पोलिसांचं हे ट्विट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं असून त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे

गुरुग्राम पोलिसांचं एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. पोलिसांनी ट्विटमधून अभिनेता शाहिद कपूरने अभिनय केलेल्या ‘कबीर सिंग’ चित्रपटातील एकाच दृश्याचा फोटो शेअर करत ट्रोल केलं आहे. या सीनमध्ये कबीर सिंग आपली प्रेयसी प्रितीला भेटण्यासाठी बुलेटवरुन जात असतो. चित्रपटातील हा सीन प्रेक्षकांना खूप आवडला होता. पण जेव्हा शाहीद कपूर बाइकवरुन जात असतो तेव्हा त्याने हेल्मेट घातलेलं नसतं.

गुरुग्राम पोलिसांनी या सीनचा स्नॅपशॉट घेत एडीट केला आहे. पोलिसांनी शाहिद कपूरला या सीनमध्ये हेल्मेट घातलेलं दाखवलं आहे. पोलिसांचं हे ट्विट नेटकऱ्यांना प्रचंड आवडलं असून त्याच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

हा फोटो ट्विट करताना गुरुग्राम पोलिसांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तू वाचलास तरच प्रितीला वाचवू शकशील. यावेळी बाइक चालवताना नेहमी हेल्मेट घालावं असंही लिहिण्यात आलं आहे.

पोलिसांच्या या ट्विटचं कौतुक होत आहे. याआधीही गुरुग्राम पोलिसांनी लोकांना वाहतुकीच्या नियमांबद्दल जागरुक करण्यासाठी असे मीम्स शेअर केले आहेत.

First Published on February 7, 2020 4:11 pm

Web Title: gurugram police tweet troll kabir singh shahid kapoor sgy 87
Next Stories
1 मोटरमनची माणुसकी! जखमी प्रवाशासाठी उलटी धावली ट्रेन
2 #Coronovirus: चीनच्या ‘हिरो’चं निधन, व्हायरसबद्दल सर्वात आधी चेतावणी देणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू
3 Video: हस्ताक्षर आहे की प्रिंटचा फॉण्ट?; व्हिडिओ पाहून तुम्हालाही प्रश्न पडेल